मतदानाच्या आधी राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, आमदाराचा भाजप प्रवेश निश्चित?

मतदानाच्या आधी राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, आमदाराचा भाजप प्रवेश निश्चित?

निवडणूक घोषणेआधी आऊटगोईंगने हैराण झालेल्या राष्ट्रवादीला आता मतदानाला काही दिवस बाकी असतानाच आणखी एक धक्का बसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे यामध्ये भर पडत चालली आहे. अशातच निवडणूक घोषणेआधी आऊटगोईंगने हैराण झालेल्या राष्ट्रवादीला आता मतदानाला काही दिवस बाकी असतानाच आणखी एक धक्का बसणार आहे.

निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेताना पाहायला मिळतात. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या मुलानेही याबाबत भाष्य करत रामराव वडकुते हे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हटलं आहे.

रामराव वडकुते हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र संधी न मिळाल्याने वडकुते हे पक्षावर नाराज होते. आता अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंगोल मतदारसंघात वडकुतेंमुळे आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होत असून 24 ऑक्टोबरला मतमोजनी होईल. त्यामुळे आता महाराष्ट्राची सत्ता कोण काबीज करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आघाडीला चितपट करत सत्ता राखण्याचं महायुतीसमोर आव्हान असणार आहे, तर युतीला धक्का देत राजकीय कमबॅक करण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागा आणि 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

कोणत्या विभागात कोणत्या पक्षाची काय होती स्थिती?

पश्चिम महाराष्ट्र

एकूण जागा - 58

भाजप - 19

शिवसेना - 12

काँग्रेस - 7

राष्ट्रवादी - 16

इतर - 4

उत्तर महाराष्ट्र

एकूण जागा - 47

भाजप - 19

शिवसेना - 8

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 8

इतर - 2

मराठवाडा

एकूण जागा - 46

भाजप - 15

शिवसेना - 11

काँग्रेस - 9

राष्ट्रवादी - 8

इतर - 3

विदर्भ

एकूण जागा - 62

भाजप - 44

शिवसेना - 4

काँग्रेस - 10

राष्ट्रवादी - 1

इतर - 3

कोकण

एकूण जागा - 75

भाजप - 25

शिवसेना - 28

काँग्रेस - 6

राष्ट्रवादी - 8

इतर - 8

VIDEO : 40 वर्षांत तुम्ही काय केलं? गवत उपटलं; पक्ष सोडून गेलेल्यांवर पवारांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 04:05 PM IST

ताज्या बातम्या