काकाआधी पुतण्याचाच शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीला धक्का देत आमदार बांधणार शिवबंधन

काकाआधी पुतण्याचाच शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीला धक्का देत आमदार बांधणार शिवबंधन

सुनील तटकरे हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कारण राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अवधूत तटकरे हे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतील, अशी माहिती आहे.

सुनील तटकरे हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. मात्र स्वत: तटकरे यांनी ही चर्चा फेटाळून लावत आपण कायम पवारसाहेबांसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. पण त्यानंतर आता सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

तटकरे Vs तटकरे

काका-पुतण्या वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. अनेक राजकीय पक्षातील काका आणि पुतण्यामधील वाद महाराष्ट्रभर गाजला आहे. रायगडच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारं तटकरे कुटुंबही याला अपवाद नाही. सुनील तटकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे यांचे भाऊ संदीप तटकरे यांनी 2016 मध्येच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का असेल.

कोण आहेत अवधूत तटकरे ?

- तटकरे कुटुंबातील एक बडे प्रस्थ

- रोह्याचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान आमदार

- प्रशासन आणि पक्षात दबदबा असणारे, यामुळे एकेकाळी तटकरे यांचा राजकीय वारसदार म्हणून अवधूत ओळखले जात होते.

- त्यांची राजकीय महत्वाकांक्षा ही नेहमीच सुनील तटकरे यांच्यासाठी कायमच अडचणीची ठरली आहे.

- सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्यानंतर आमदारकी आपल्यालाच मिळाली पाहिजे, असा दावा करत अवधूत यांनी काकांनाच आव्हान दिले.

VIDEO: 'राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही', दानवेंकडून शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 12:16 PM IST

ताज्या बातम्या