• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'आधी पाया पक्का करावा लागतो' एकाच व्यासपीठावर धनंजय मुंडेंचा प्रीतम मुंडेंना टोला

'आधी पाया पक्का करावा लागतो' एकाच व्यासपीठावर धनंजय मुंडेंचा प्रीतम मुंडेंना टोला

 'मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे'

'मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे'

'मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे'

  • Share this:
बीड, 31 ऑगस्ट : 'मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेलं परळीचा विकासाच स्वप्न लवकरच साकार होणार मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते (ncp) आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांनी भाजप खासदार प्रीतम मुंडे (bjp mla Pritam Munde ) यांचा खोचक टोला लगावला. बीड (beed) जिल्ह्याच्या परळी येथील आयोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे तर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी एकाच मंचावर उपस्थिती लावली. नवरदेवाचं कृत्य पाहून भडकली नवरी; खुर्चीत मांडला ठाण, वरमाला घालायलाही तयार नाही या प्रसंगी बोलतांना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, 'परळीत सुरू असलेल्या विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अनेक खड्डे पडले असल्यामुळे मला आज या कार्यकर्मात येण्यास वेळ लागला' असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना टोला लगावला. त्यानंतर भाषणासाठी उभे राहिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना चांगलाच सल्लावजा टोला लगावला.  'मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेलं परळीचा विकासाच स्वप्न लवकरच साकार होणार आहे. मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे. परळीत सुरू असलेले रस्त्याचे काम आधी पक्के करणार आहे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना प्रतिउत्तर देत टोला लगावला.

धक्कादायक! सेक्स पार्टनर समजून समुद्री साप करताहेत माणसांवर हल्ले

तसंच, 'यामुळे मी आपल्या परळीच्या विकास कामाचा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागत आहे म्हणून प्रीतम मुंडे यांना या ठिकाणी येण्यास वेळ लागला असावा, असं मला वाटतं, असं म्हणत धनंजय मुंडेंनी खोपरखळी मारली.
Published by:sachin Salve
First published: