मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'ते' पुन्हा काढण्यास लावू नका, धनंजय मुंडेंचा फडणवीसांना थेट इशारा

'ते' पुन्हा काढण्यास लावू नका, धनंजय मुंडेंचा फडणवीसांना थेट इशारा

'एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम करता येत नसेल, तर त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने षडयंत्र करून बदनाम करण्याची भाजपची पूर्वीची सवय आहे'

'एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम करता येत नसेल, तर त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने षडयंत्र करून बदनाम करण्याची भाजपची पूर्वीची सवय आहे'

'एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम करता येत नसेल, तर त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने षडयंत्र करून बदनाम करण्याची भाजपची पूर्वीची सवय आहे'

  • Published by:  sachin Salve

अहमदनगर, 26 नोव्हेंबर : 'तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या आहेत, त्याच्या काळातीळ अनेकांनी ऑडिओ क्लिप आणि व्हिडीओ क्लिप पाहिल्या आहेत. ते पुन्हा पुन्हा काढण्यास लावू नका,' असा इशारा राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना पाहण्यास मिळत आहे.  आता या वादात धनंजय मुंडे यांनीही उडी घेतली आहे. अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जशास तसे उत्तर दिले.

कुंभकर्ण असता तर त्याने आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांची जोरदार टीका

'एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम करता येत नसेल, तर त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने षडयंत्र करून बदनाम करण्याची भाजपची पूर्वीची सवय आहे. राज्याचे मुख्यमंत्री धमकावणारे आहेत, असे विरोधी पक्षनेते म्हणत आहेत. परंतु, फडणवीस यांनी कशा प्रकारे विरोधकांना धमकावले आहे.  त्याच्या काळातीळ अनेकांनी ऑडिओ क्लिप आणि व्हिडीओ क्लिप पाहिल्या आहेत. ते पुन्हा पुन्हा काढण्यास लावू नका, असा इशारा धनंजय मुंडेंनी दिला.

पिल्लाला वाचवण्यासाठी सापाशी भिडली आई; उंदरीणीच्या धाडसाचा थरारक VIDEO VIRAL

'गेल्या एक वर्षाच्या काळात अनेक संकटे आली, त्यात सर्वात मोठे संकट कोरोना होते. या संकटाला तोंड देत महाराष्ट्राच्या जनतेचे आरोग्य सांभाळत, विकासाची सांगड घालत सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. या काळात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले असून काही निर्णय, काही कामे आम्हाला सर्वदूर महाराष्ट्रात सुरू करायची होती. मात्र, केंद्राने जीएसटीचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे थोडे आर्थिक निर्बंध आले आहेत, या आर्थिक निर्बंधांमुळे ज्या गतीने महाराष्ट्राचा विकास गेल्या एक वर्षाच्या काळात करायचा होता, ती गती मात्र मंदावली,' असंही त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी कुंडली विधानाची करून दिली आठवण

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊत यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. 'मुळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत ऐकली हे महत्त्वाचे आहे.  आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आनंदाचा आहे, विरोधी पक्षानं त्यांच्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी केली, त्याचा मी आदर करतो.  फडणवीस हे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की, मी विरोधकांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे. मग ही कोणती भाषा होती. त्यांची अनेक विधान माझ्या स्मरणात आहे. पण त्यांचे हे विधान गंभीर होते, धमकी देणारे नव्हते का? असा उलट सवाल राऊत यांनी फडणवीस यांना विचारला आहे.

रोहित पवारांनी केलं पंतप्रधान मोदींचं स्वागत, भाजप नेत्यांकडे केली 'ही' अपेक्षा

तसंच, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख सुद्धा आहे. जर एखादी तपास यंत्रणा दबाव टाकण्यासाठी वापरली जात असेल तर राज्याचे प्रमुख म्हणून टीका करणारच.  केंद्रीय संस्था बेकायदेशीरपणे मागे लागेल असेल तर त्याला तशाच भाषेत उत्तर देऊ. जर कुणाला हे पटत नसेल तर त्यांनी टीका करावी. विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. पण, त्यांनी खोटेपणाचा आश्रय घेऊ नये' असा सणसणीत टोलाही राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.

First published: