मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जळगावात शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...

जळगावात शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...

मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  News18 Desk

जळगाव, 28 ऑक्टोबर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. यानंतर शिवेसेनेच्या 40 पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत वेगळा गट स्थापन केला. यानंतर अनेकांचा ओढा या शिंदे गटाकडे जाण्याचा दिसत आहे. यातच आज जळगावात शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना जोरदार धक्का दिला आहे.

शिंदे गटाचा धक्का कसा -

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या बालेकिल्लातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंना आधी लोण्याचे धक्के, नंतर तुपाची धक्के आणि आता माणसांचे धक्के, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांचा एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.

एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्लातील मुक्ताईनगर व रावेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. जळगाव वाद मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, यावेळी बोलतांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आधी लोण्याचे धक्के नंतर तुपाचे धक्के आणि आता माणसांचे धक्के असा टोला एकनाथ खडसेंना लगावला आहे.

हेही वाचा - NCP Kolhapur : हसन मुश्रीफांची मनधरणी वाया, राष्ट्रवादीचा नेता शिंदे गटात होणार सामील!

सोलापुरातही शरद पवारांचे खंदे सर्मथक शिंदे गटाच्या वाटेवर -

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जुन्या फळीतील नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनीसुद्धा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच दिलीप कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती.

ही माहिती आता खरी ठरली आहे. कारण दिवाळीनंतर आपण 25 जणांना सोबत घेऊन शिंदे गटा प्रवेश करणार असल्याची माहिती दिलीप कोल्हे यांनी दिली आहे. दरम्यान, दिलीप कोल्हे यांच्या शिंदे गटामध्ये जाण्याच्या निर्णयाने सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Eknath khadse, Gulabrao patil