फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली, बोलावली तातडीची बैठक

फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली, बोलावली तातडीची बैठक

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जून : अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत रणनीती ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत दिवसभरातील कामकाजाची रणनीती आखण्यात येणार आहे. तसंच विधानपरिषद सभापतींवर अविश्वास ठराव आणण्याच्या भाजपच्या खेळीला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केली जातील. त्यामुळे अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी बजेट सादर करण्यात आलं. यावेळी अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातला. यात विधानपरिषदेत रामराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांत दुजाभाव केल्याचा आरोप भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आला. तसंच रामराजेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबतही भाष्य केलं.

भाजपने अविश्वास ठराव मांडल्यास रामराजे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक स्वराज्या संस्थांतील पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलं आहे. अशावेळी रामराजे यांना विधानपरिषद सभापती म्हणून आपलं पद कायम राखणं कठीण होऊ शकतं.

दुसरीकडे, आघाडीचे काही नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते अशी ओळख असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीत नाराज असल्याचं दिसत आहे.

साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. दोन्ही राजेंनी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला असल्याची माहिती आहे. तसंच आगामी काळात रामराजे शिवसेनेचं शिवबंधन बांधण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

VIDEO : ओवेसींकडून 'जय श्रीराम'च्या घोषणांना 'जयभीम'ने उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: NCP
First Published: Jun 19, 2019 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading