शिवसेनेसोबत सत्तास्थापना आणि भाजपचे आमदार संपर्कात, जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

शिवसेनेसोबत सत्तास्थापना आणि भाजपचे आमदार संपर्कात, जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांनी सत्तास्थापनेबद्दल महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

  • Share this:

पुणे, 17 नोव्हेंबर : पुण्यात आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मोदीबाग निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे. दिलीप वळसे पाटील हे उपस्थित आहे. ही बैठक सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांनी सत्तास्थापनेबद्दल महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आमदार आणि काही अपक्ष आमच्या संपर्कात आहेत. त्या त्या तालुक्यातील नेत्यांना विश्वास घेऊन आम्ही भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना परत घ्यायचं की नाही, याबाबतचा निर्णय घेऊ. आम्ही मेगाभारती करणार नाही तर मेरिट भरती करू. जनतेच्या मनातील सरकार आम्ही देणार आहोत. स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत,' अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

'भाजपसोबत जाणार नाही'

'आम्ही ज्यांच्या विरुद्ध लढलो, ज्यांची विचारधारा वेगळी आहे त्यांच्याबरोबर जाणार नाही,' असं म्हणत जयंत पाटील यांनी आपण सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांना शिवसेनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'दगडापेक्षा वीट मऊ.'

दरम्यान, राष्ट्रवादीच्या पुण्यातील या बैठकीत शिवसेनेसोबत सरकार स्थापन्यासाठीच्या किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण या बैठकीनंतरच दिल्लीत शरद पवार हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटून प्रस्तावित महाशिवआघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकतात.

गडकरींच्या 'गुगली'वर शरद पवारांचा 'षटकार', एकदा पाहाच हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: November 17, 2019, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading