राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराने बोलावली कार्यकर्त्यांची बैठक, पक्ष बदलणार?

राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराने बोलावली कार्यकर्त्यांची बैठक, पक्ष बदलणार?

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर, 6 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांत राष्ट्रवादी सर्वात मोठे धक्के बसले आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.

माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर ही बैठक होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सात गटातील बबनदादा शिंदे समर्थकांची गटनिहाय बैठक होणार आहे. यावेळी आमदार शिंदे हे आपल्या समर्थकांच्या भावना जाणून घेतील. बबनदादा शिंदे हेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवल्याने ते आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीचा 'प्लॅन पलटवार' तयार, मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू

माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. मात्र अजून राजकीय वाटाघाटी पूर्ण झाल्या नसल्याने बबनदादा शिंदेंचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला असल्याची माहिती आहे.

बबनदादा शिंदे यांचा भाजप प्रवेश झाला नसला तरीही राष्ट्रवादीने या मतदारसंघात कंबर कसली आहे. राष्ट्रवादीकडून बबनदादा शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवाजी कांबळे यांना विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं.

सोलापूरमधील नेत्यांबद्दलचा सस्पेन्स कायम

विविध जिल्ह्यांतील तीन नेत्यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूरमधील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादीचे उस्मानाबादमधील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह त्यांचे वडिल आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील तसंच कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, साताऱ्यातील काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांचा समावेश आहे. यावेळी खुद्द सोलापूरमधील नेत्यांचा भाजप प्रवेश मात्र लांबणीवर पडल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO: तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, बाप्पाची वर्गणी दिली नाही म्हणून काढला राग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 12:13 PM IST

ताज्या बातम्या