परभणीत राष्ट्रवादीचे 3 आमदार असूनही सत्ता गमावली, काँग्रेसने मिळवली

परभणीत राष्ट्रवादीचे 3 आमदार असूनही सत्ता गमावली, काँग्रेसने मिळवली

परभणीत काँग्रेसला बहुमत मिळालंय. इथे गेल्या 10 वर्षांपासून असलेल्या राष्ट्रवादीला परभणीकरांनी जोरदार धक्का दिलाय

  • Share this:

पंकज क्षीरसागर, परभणी

21 एप्रिल : परभणीत काँग्रेसला बहुमत मिळालंय. इथे गेल्या 10 वर्षांपासून असलेल्या राष्ट्रवादीला परभणीकरांनी जोरदार धक्का दिलाय.

सगळीकडून फक्त पराभवचं पदरी येत असलेल्या काँग्रेसला परभणीत मात्र दिलासा मिळालाय. गेल्या 10 वर्षांपासून परभणी महानगरपालिकेवर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीला यावेळी जनतेने साफ नाकारत काँग्रेसला सत्तेच्या अगदी जवळ बसवले आहे.

मागील अनेक वर्षांपासून परभणी पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. राष्ट्रवादीचे या जिल्ह्यात 3 आमदार आहेत. पण जिल्हा परिषद हातात असताना महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या एकही वरिष्ठ नेत्याने लक्ष दिलं नाही. त्यामुळे महापालिकेतली सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली. काँग्रेसचे स्थानिक नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 31 जागा काँग्रेसला मिळाल्यात तर राष्ट्रवादीला या केवळ 18 जागा मिळल्यात.

विशेष बाब म्हणजे शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वावाखाली निवडणूक लढवण्यात आली. पालकमंत्री गुलाब राव पाटील आणि अर्जुन खोतकर यांच्या सभा या ठिकाणी झाल्या. पण शिवसेनेला काही यश मिळालं नाही. तर भाजपला कुठलेही स्थानिक नेतृत्व नसताना 2 जागांवरून 8 जागा परभणीकरांनी दिल्यात.  एकूणच राष्ट्रवादीला महापौरपदाचा उमेदवार न मिळणं पाणी पुरवठा योजनेतीळ ढिसाळ कारभार याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला तर याच निवडणुकीत शिवसेना संपर्क प्रमुख विवेक नावंदर, विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे यांचाही पराभव झालाय. सत्तेसाठी पुन्हा काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ घ्यावी लागतेय का हेच महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2017 06:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading