पवारांची साथ सोडणाऱ्या 9 आमदारांची यादी आली समोर; चार्टर्ड विमानाने दिल्लीला रवाना

पवारांची साथ सोडणाऱ्या 9 आमदारांची यादी आली समोर; चार्टर्ड विमानाने दिल्लीला रवाना

या क्षणाची महत्त्वाची बातमी म्हणजे या NCP च्या या 9 आमदारांना खास चार्टर्ड प्लेनने दिल्लीला पाठवण्यात आलेलं आहे.

  • Share this:

विनया देशपांडे

मुंबई, 23 नोव्हेंबर : भाजपला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे आमदार कोण हे अद्याप समोर आलेलं नाही. पण News18 च्या हाती यापैकी 9 आमदारांची यादी आली आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी म्हणजे या 9 आमदारांना खास चार्टर्ड प्लेनने दिल्लीला पाठवण्यात आलेलं आहे.

ज्या खास विमानाने हे आमदार दिल्लीला जाणार आहेत, त्या विमानाच्या ऑपरेटरकडूनच ही यादी आल्यामुळे ही माहिती खात्रीपूर्वक आहे.

दौलत दरोडा, नरहरी झिरवार, संजय बनसोडे, दिलीप बनकर, अनिल पाटील, नितीन पवार, सुनील शेळके, बाबासाहेब पाटील अशी ती 9 नावं आहेत.

शरद पवार यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंबरोबर पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे आमदार फुटलेले नाहीत, असं सांगितलं होतं. राजभवनावर गेलेले आमदार अंधारात होते. त्यांना काय घडणार याची कल्पना नसावी, असंही शरद पवार म्हणाले होते. पण चार्टर्ड फ्लाइटने दिल्लीला निघालेल्या आमदारांची यादी हाती आल्यामुळे आता नेमकं काय घडणार याची कल्पना येत आहे.

महाराष्ट्राला नव्हे तर देशाला धक्का देणाऱ्या घडामोडी एका रात्रीत घडल्या आहेत.

वाचा - महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा हायव्होल्टेज ड्रामा, शरद पवारांनी केले धडाधड ट्वीट्स

शुक्रवारी संध्याकाळी महाविकास आघाडीचं पर्यायी सरकार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक पार पडली आणि त्यात सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. या बैठकीला हजर असलेले अजित पवार दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत थेट भाजपबरोबरच्या सरकारमध्ये सामील झाले.

अन्य बातम्या

EXCLUSIVE शपथविधीपूर्वीच्या रात्री मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर केली खास तंत्रपूजा

शपथविधी झाला पण सरकारचं काय होणार? या आहेत 3 शक्यता

'चोर दरवाजाने मुंबईवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला', केंद्रीय मंत्र्यांचा आरोप

 

First published: November 23, 2019, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading