मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नगरच्या राजकारणानंतर आठवलेंचं राष्ट्रवादीबाबत मोठं वक्तव्य

नगरच्या राजकारणानंतर आठवलेंचं राष्ट्रवादीबाबत मोठं वक्तव्य

'राजकारणात काहीही होऊ शकतं. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी शरद पवार यांनी मदत करावी'

'राजकारणात काहीही होऊ शकतं. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी शरद पवार यांनी मदत करावी'

'राजकारणात काहीही होऊ शकतं. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी शरद पवार यांनी मदत करावी'

    अहमदनगर, 28 डिसेंबर : 'राष्ट्रवादीने अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपला मदत करून चांगली भूमिका घेतली. भविष्यात राष्ट्रवादी एनडीएसोबत येऊ शकते,' असा अंदाज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

    'राजकारणात काहीही होऊ शकतं. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी शरद पवार यांनी मदत करावी,' असं आवाहनही रामदास आठवलेंनी केलं आहे. आठवलेंच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.

    नगरमध्ये मोठी उलथापालथ

    नगर महापौर निवडणुकीत सर्वांना धक्का देत भाजपने बाजी मारली आहे. पण भाजपच्या या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कारण पक्षनेतृत्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली आहे.

    'या निवडणुकीत भाजपला मदत न करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक नेत्यांना दिले होते,' अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जात नगरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला मदत केल्याचं उघड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मदतीमुळेच भाजपचा महापौर होऊ शकला आहे.

    अहमनगरच्या महापौरपदाचा फैसला काही वेळापूर्वीच झाला. या निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेला धोबीपछाड केलं आहे. भाजपचे बाबासाहेब वाकळेच महापौर होणार असल्याचं काही प्रमाणात निश्चित झालं आहे.

    शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी इतर सर्वपक्षीयांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यात राष्ट्रवादीच्या संपत बरस्कार यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे गिरीश महाजन यांची खेळी यशस्वी झाली आहे.

    0 डिसेंबर रोजी अहमदनगर महापालिका निवडणुकांची मतमोजणी झाली. 68 जागांपैकी शिवसेना-24, राष्ट्रवादी-18, भाजप-14 असं या निवडणुकीत संख्याबळ राहिलं. त्यामुळे 35 जागांचा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही. असं असतानाही महापौरपदाच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपनंही बाजी मारली आहे.

    VIDEO :..आणि अजित पवार डोंबिवलीला निघाले लोकलने!

    First published:

    Tags: NCP, NDA, Ramdas athavale