मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विरोधकांनी टीका करावी पण दिलदारपणे, सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांना मिश्किल टोला

विरोधकांनी टीका करावी पण दिलदारपणे, सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांना मिश्किल टोला

आमचं सरकार हे दडपशाहीचे सरकार नाही. यामुळे विरोधकांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी, विरोधकांना टीका करण्याची मुभा आहे

आमचं सरकार हे दडपशाहीचे सरकार नाही. यामुळे विरोधकांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी, विरोधकांना टीका करण्याची मुभा आहे

आमचं सरकार हे दडपशाहीचे सरकार नाही. यामुळे विरोधकांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी, विरोधकांना टीका करण्याची मुभा आहे

    रायगड, 27 जून: आमचं सरकार हे दडपशाहीचे सरकार नाही. यामुळे विरोधकांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी, विरोधकांना टीका करण्याची मुभा आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मिश्किल टोला लगावला.

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत करण्यात आलेल्या युती संदर्भात केलेल्या वक्तव्या संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, टीका करणे हा त्यांचा अधिकार असून आमच्या सरकारमध्ये कुणालाही मनमोकळेपणे बोलण्याचा अधिकार आहे. तर, आमचं सरकार हे दडपशाहीच सरकार नसून विरोधकांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी, असंही म्हटलं आहे.

    हेही वाचा.. शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी, सत्तास्थापनेच्या दाव्यावर फडणवीसांनाही टोला

    निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि यांचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी रायगड जिल्ह्याचा दौरा केला.

    निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीसह विविध भागात कोट्यवधींची वित्तहानी व मनुष्यहानी देखील झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. चक्री वादळाने अनेक घरे व शाळांचे पत्रे फुटले. नाडगावमध्ये शाळेला राष्ट्रवादीकडून पत्रे वाटप करण्यात आले. यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री व विरोधी पक्ष नेत्यांनी पाहणी दौरे करून नुकसानग्रस्त नागरिकांना आधार दिला.

    हेही वाचा.. कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही; शरद पवारांचा मोठा खुलासा

    वादळग्रस्त भागाला सरकारकडून निधीची कमतरता भासणार नाही, खासदार या नात्याने सुनील तटकरे यांनी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. शरद पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वाशीत केले आहे.

    First published:
    top videos

      Tags: Devendra Fadanvis, Mp supriya sule, NCP chief sharad pawar