Home /News /maharashtra /

भूखंडाचे 'श्रीखंड' पडले भारी, राष्ट्रवादी नगराध्यक्षाला मुलाला पडल्या बेड्या!

भूखंडाचे 'श्रीखंड' पडले भारी, राष्ट्रवादी नगराध्यक्षाला मुलाला पडल्या बेड्या!

 नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या पदाचा गैरवापर व दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या पदाचा गैरवापर व दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या पदाचा गैरवापर व दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

उस्मानाबाद, 12 जानेवारी : उस्मानाबाद (osmanabad) परांडा नगरपालिकेचे (Paranda Municipality) राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर (NCP leader Zakir Saudagar) याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. वसीम जाकीर सौदागर (Wasim Zakir Saudagar) याच्यावर जमिनीवर शासकीय आरक्षण असताना देखील जमीन खरेदी केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी अखेर अटकेची कारवाई केली आहे, त्यामुळे नगरपालिका निवडणूकच्या पूर्वी राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील जमीन सर्वे नं.234 /ब यांचे खरेदी खत करून नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या पदाचा गैरवापर व दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. स्वतः च्या मुलासाठी आरक्षित जमिनीचे बेकायदेशीररित्या नावे केल्याप्रकरणी वसीम जाकीर सौदागर यांच्या विरोधात भा.द.वि. कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज परंडा पोलिसांनी आरोपी वसीम सौदागर याला अटक केली आहे. (राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; आणखी 3 दिवस कोसळणार सरी, या जिल्ह्यांना इशारा) परांडा शहरातील 234 गट ब मधील जमिनीवर शासकीय आरक्षण आहे. पण तरी देखील जमीन खरेदी केल्याचा आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.  बाप लेकावर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. (वेस्ट इंडिजच्या खेळाडूने मारला सिक्स, आपल्याच सहकाऱ्याच्या Range Rover ला डेंट) याआधी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यात नगरपालिका मधील कर्मचारी सुद्धा तपासात दोषी आढळून आले होते. या प्रकरणाच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी आणि मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.  कोर्टात देखील खटला सुरू आहे. अनेक तक्रारी दाखल होऊन बराच कालावधी लोटल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, त्यामुळे आता या प्रकरणातील मुख्य आरोपीला ही अटक करणार का याकडे लक्ष लागले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या