शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक, घडामोडींना वेग

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक, घडामोडींना वेग

युतीच्या सत्ता स्थापनेत अडचणी निर्माण झाल्या असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

  • Share this:

मुंबई, 2 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

शरद पवार हे उद्या (रविवारी) संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. युतीच्या सत्ता स्थापनेत अडचणी निर्माण झाल्या असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

काँग्रेस नेत्यांचीही दिल्लीत झाली आहे बैठक

राज्यात सत्तास्थापनेचा डाव रंगलेला असताना काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झालं. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार माणिकराव ठाकरे यांनी सोनियांच्या भेटीची वेळ मागितली खरी, पण त्यांच्या पदरी निराशाच आली. सोनियांनी काँग्रेसच्या नेत्यांना सरचिटणीस वेणुगोपाल यांची भेट घेण्याचा आदेश दिला. शिवसेनेसोबत जाणार नाही असे स्पष्ट संकेतच सोनिया गांधींना द्यायचा होता, असं सांगितलं जातं आहे. संध्याकाळी काँग्रेस नेते पुन्हा सोनियांच्या निवासस्थानी दाखल झाले.

दिल्लीतील भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

वेणुगोपाल यांनी सर्व काँग्रेस नेत्यांची खरडपट्टी काढल्याचंही सांगितलं जात आहे. शिवसेनेसोबात जायचं असेल तर काँग्रेसने राम मंदिर, कलम 370, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत काय भूमिका घ्यावी, असे प्रश्न विचारून नेत्यांना निरुत्तर केलं. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष असल्यानं सेनेसोबत जाऊ शकत नाही, असं वेणुगोपाल यांनी बजावलं.

VIDEO : 'नेत्यांना सुबुद्धी देवो' भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या...

First published: November 2, 2019, 2:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading