मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द का झाली? सुनील तटकरेंनी केला खुलासा

दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द का झाली? सुनील तटकरेंनी केला खुलासा

राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी बैठकीबाबत खुलासा केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी बैठकीबाबत खुलासा केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी बैठकीबाबत खुलासा केला आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 19 नोव्हेंबर : महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार होती. मात्र अचानक ही बैठक रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत होती. ही बैठक रद्द का करण्यात आली, याबाबत आता राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी खुलासा केला आहे.

'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार होती. मात्र आज देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिराजी गांधी यांची जयंत आहे. त्यामुळे बहुतांश काँग्रेस नेते तिकडे व्यस्त असतील. त्यामुळे आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. मात्र ही बैठक उद्या होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे नेते उपस्थित असतील. तर काँग्रेसकडूनही केंद्रातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते बैठकीसाठी हजर असतील,' अशी माहिती सुनिल तटकरे यांनी दिली आहे.

'शरद पवार समजून घ्यायला त्यांना 100 जन्म घ्यावे लागतील'

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच वाढला असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे संभ्रम वाढला आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

'ज्या लोकांना महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन व्हावं, असं वाटत नाही ते खोट्या बातम्या पसरवत आहेत. मोदी-शहा समजून घेण्यासाठी तुम्हाला 25 जन्म लागलीत, असं भाजपच्या एका नेत्याने मला म्हटलं होतं. आता मी यांना म्हणतो की शरद पवार समजून घेण्यासाठी तुम्हाला 100 जन्म लागतील,' असं म्हणत संजय राऊत भाजपवर घणाघाती हल्ला केला आहे. तसंच महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन होईल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

VIDEO: सत्ता स्थापनेवरुन शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ, पाहा काय म्हणाले

First published:

Tags: Sunil tatkare