नाशिक, 28 ऑक्टोबर: धाडी, आयात, निर्यात हे सर्व निर्णय केंद्र सरकारच्या अधिकारात आहेत. मात्र, जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला मग कारवाई का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला खडसावलं आहे.
निर्यात बंद, आयात सुरू हा निर्णय अतर्क्य आहे. कांदा, ट्रान्सपोर्टेशन 25 टन मर्यादा देखील चुकीची आहे. या मुद्द्यावर आपण केंद्राशी चर्चा करणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयानं हा प्रश्न सुटू शकतो. राज्य सरकार कडून फार या प्रश्नावर अपेक्षा करू नये, असं देखील शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर काल तोडगा काढला. त्यानंतर आज ते नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी शरद पवार यांनी चर्चा केली.
कांदा व्यापारी, शेतकरी, बाजारसमिती संचालकांशी शरद पवार यांनी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. अघोषित कांदा लिलाव बंदवर चर्चा केली. कांदा प्रश्नावर तोडगा काढा, असं व्यापाऱ्यांनी शरद पवारांकडे मागणी केली. केंद्र सरकारला स्टॉक लिमिट रद्द करण्याची विनंती करा, असं साकडं देखील व्यापाऱ्यांनी घातलं. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा...पंकजा मुंडेंना रोहित पवार म्हणाले.. धन्यवाद ताई! खिलाडूवृत्तीचंही केलं कौतुक
शरद पवार म्हणाले, महाग कांदा वाण विकणाऱ्या सिड्स कंपनीविरुद्ध तक्रारीची दखल घेतली जाणार आहे.
सरकार याची चौकशी करेल. केंद्र सरकारशी चर्चा करून तक्रार निवारण करू. मात्र, मार्केट बंद करू नका. शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होऊ देऊ नका, असा सल्ला शरद पवार यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...
- महाग कांदा वाण विकणाऱ्या सिड्स कंपनी विरुद्ध तक्रारीची दखल घेणार
- सरकार याची चौकशी करेल
- मी आज केंद्र सरकार कडे वेळ मागणार
- शेतकरी आणी व्यापारी यांचं शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाऊ
- केंद्रासोबत बोलून धोरण ठरवण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरू
- केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयानं हा प्रश्न सुटू शकतो
- राज्य सरकार कडून फार या प्रश्नावर अपेक्षा करू नये
- धाडी,आयात,निर्यात हे सर्व निर्णय केंद्र सरकारच्या अधिकारात
- जीवनावश्यक यादीतून,केंद्रानं कांदा वगळला मग कारवाई का ?
- निर्यात बंद,आयात सुरू हा निर्णय अतर्क्य
- केंद्राशी चर्चा करणार
- कांदा,ट्रान्सपोर्टेशन 25 टन मर्यादा चुकीची
- शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक
- कांदा व्यापारी, शेतकरी, बाजारसमिती संचालक करताय,शरद पवार यासोबत चर्चा
- अघोषित कांदा लिलाव बंद वर चर्चा
- तोडगा काढा,व्यापाऱ्यांचं पवार यांना साकडं
- केंद्र सरकारला स्टॉक लिमिट रद्द करण्याची विनंती करा- मागणी