रोहित पवारांची एवढी आहे संपत्ती, महागड्या घड्याळांचाही छंद

रोहित पवारांकडे वारसा हक्काने 3 कोटी 45 लाखांची संपत्ती आहे. भाजपचे नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याशी त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 06:52 AM IST

रोहित पवारांची एवढी आहे संपत्ती, महागड्या घड्याळांचाही छंद

मुंबई 03 ऑक्टोंबर : राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. शरद पवारांचे नातू असलेले रोहित हे पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे शिलेदार आहेत. गेली काही वर्ष रोहित हे कर्जत जामखेडसाठी प्रयत्न करत होते. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमही त्या भागात राबवले. रोहित पवार यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 27 कोटी 44 लाख 29 हजार 200 रुपये एवढी असल्याचं जाहीर केलंय. त्यांच्याकडे वारसा हक्काने आलेली 3 कोटी 45 लाखांची संपत्ती आहे. त्यांच्या बँक खात्यात 2 कोटी 75 लाख 31 हजार रुपये आहेत. बॉन्ड आणि शेअर्समध्ये त्यांनी 9, 65, 11,071 एवढी गुंतवणूक केलीय. रोहित पवार यांच्याकडे लॉगीनेस, ओमेगा, रोलेक्स, कार्टर, टॅग ह्युअर, या कंपन्यांची घड्याळं असल्याचं रोहित पवार यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. भाजपचे नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याशी त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांविरुद्ध काँग्रेसने आशिष देशमुखांना उतरवलं आखाड्यात

उदयराजे भोसलेंपेक्षा अबू आझमींची संपत्ती जास्त

राज्यातल्या विधानसभा निवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता फक्त 1 दिवस राहिलाय. 4 ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झालीय. अर्ज भरण्यासोबतच उमेदवारांना प्रतिज्ञापत्रही द्यावं लागतं. त्यात प्रत्येक उमेदवारांना आपलं उत्पन्न, स्थावर-जंगम मालमत्ता, असलेले गुन्हे याचा सर्व तपशील द्यावा लागतो. त्यामुळे अनेक गोष्टी मतदारांपुढे येत असून श्रीमंत उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू झालीय. या सगळ्यात नंबर मारला तो भाजपचे मुंबईतले उमेदवार मंगलप्रभात लोढा यांनी त्यांची संपत्ती तब्बल 500 कोटींची आहे. तर साताऱ्यातून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उभे असलेले भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा अबू आझमी यांची संपत्ती जास्त असल्याची माहिती पुढे आलीय.

WhatsAppवर राजकीय कमेन्ट करताना सावधान, पोलिसांनी बजावल्या Group Adminना नोटीसा

Loading...

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असून अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. यामुळे सर्वच पक्षाचे उमेदवार सध्या अर्ज दाखल करण्याच्या गडबडीत आहेत. अर्जासोबत दाखल करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रामुळे सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून उभ्या असलेल्या उमेदवाराची नेमकी माहिती मिळवता येते. तसंच त्या उमेदवारावर दाखल असलेले गुन्हे, किती संपत्ती आहे हेदेखील यानिमित्ताने कळते.

खडसे आणि तावडेंचा पत्ता कट, भाजपचा असा आहे 'नवा प्लान'!

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा राजानामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय. ते साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत. तर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी हे मुंबईतल्या मानखुर्द शिवाजीनगरमधून विधानसभेसाठी उभे आहेत. आझमी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 209 कोटी 8 लाखांची संपत्ती असल्याचं जाहीर केलंय. तर उदयनराजे भोसले यांच्याकडे 152 कोटी 22 लाखांची संपत्ती आहे असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 06:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...