मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nawab Malik : नवाब मलिकांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ

Nawab Malik : नवाब मलिकांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. मात्र आज देखील मलिक यांना दिलासा मिळू शकलेला नाहीये. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. मात्र आज देखील मलिक यांना दिलासा मिळू शकलेला नाहीये. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. मात्र आज देखील मलिक यांना दिलासा मिळू शकलेला नाहीये. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 जानेवारी :  राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. मात्र आज देखील मलिक यांना दिलासा मिळू शकलेला नाहीये. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. कुर्ला येथील जमीन गौरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटक झाली होती, तेव्हापासून नवाब मलिक हे जामिनीच्या प्रतिक्षेत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली, मात्र आज देखील त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

मलिक यांच्यावर कुर्ल्यातील रुग्णालयात उपचार 

नवाब मलिक यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. मात्र आज देखील मलिक यांना दिलासा मिळू शकलेला नाहीये. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सध्या नवाब मलिक यांच्यावर न्यायालयाच्या परवानगीने कुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : संजय राऊतांना दिलासा; जामिनाविरोधात ED कडून दाखल याचिकेबाबत मोठी अपडेट

 नेमकं कय आहे प्रकरण? 

हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीनं आरोप केलाय. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

First published:

Tags: Court, Nawab malik