'शिवसेनेनं सत्तास्थापनेचा दावा केल्यास आम्ही...', राष्ट्रवादीने जाहीर केली भूमिका

'शिवसेनेनं सत्तास्थापनेचा दावा केल्यास आम्ही...', राष्ट्रवादीने जाहीर केली भूमिका

राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 3 नोव्हेंबर : 'शिवसेनेनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. भाजपसोबत जाणार नाही हे शिवसेनेनं स्पष्ट केलं तर या राज्यात काहीही घडू शकतो. शिवसेनेने जर भूमिका घेतली तर राज्यात वेगळं राजकारण होऊ शकतं,' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे.

'शिवसेना जर भाजपबरोबर सत्तेत बसायला तयार असेल तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करू आणि शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी दावा केला तर आम्हीही त्याबाबत नंतर भूमिका घेऊ,' असं म्हणत राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी पक्षासमोर अद्यापही सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जर शिवसेनेनं ठोस भूमिका घेतली तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात वेगळं राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांनी घेतली आहे पवारांची भेट

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. तसंच त्यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जवळकीची चर्चा होत आहे.

राजकीय परिस्थितीबद्दल अजित पवार काय म्हणाले?

'राष्ट्रपती राजवटीची भाषा कोणी करत असेल तर तो प्रयत्न शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी होत असेल. पण असं काही होणार नाही. मुख्यमंत्री कुणाला करावा हा शिवसेना आणि भाजपचा निर्णय आहे. अनेकदा विधिमंडळाच्या सदस्य नसलेल्यांनाही मुख्यमंत्रिपद दिलं गेलं आहे,' असं म्हणत अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चेवर उत्तर दिलं आहे.

परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

Published by: Akshay Shitole
First published: November 3, 2019, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading