किशोर गोमाशे, प्रतिनिधी
वाशिम, 04 डिसेंबर : 'एनसीबी (ncb) मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे (sameer wankhede) यांनी जातीच्या खोट्या प्रमाणपत्रावर (cast certificate) नोकरी मिळविली, त्यामुळे त्यांची नोकरी जाणार' असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केलं होतं. मात्र त्यांचे नातेवाईक यांच्यासह समीर वानखेडे यांच्या जवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याने त्यांचे चुलतभाऊ संजय वानखेडे (sanjay wankhede) यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरुद्ध वाशिम शहर पोलिसांत (washim police) ॲट्रॉसिटी ऍक्टनुसार तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मेनजोगे यांनी नवाब मलिक यांना 13 डिसेंबर रोजी वाशिम कोर्टात आपलं म्हणणं मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
समीर वानखेडे यांचे चुलतभाऊ संजय वानखेडे यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे विरूद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत वाशिम येथील न्यायालयामध्ये एका याचिकेद्वारे मागणी केली होती. याबाबत याचिकाकर्ते संजय वानखेडे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.उदय देशमुख यांनी न्यायालयामध्ये जोरदार युक्तीवाद केला. तेव्हा जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी मंत्री नवाब मलिक यांना आपली बाजू मांडण्यासाठी 13 डिसेंबर रोजी वाशिम न्यायालयात हजर राहावे असा आदेश दिला आहे.
Green Peas: तुम्ही मटार भरपूर खाता ना? मग या गोष्टीही तुम्हाला माहीत असाव्यात
या प्रकरणात नवाब मलिक त्यांची बाजू मांडण्यासाठी वाशिम न्यायालयात येणार असल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.
समीर वानखेडे हे मूळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात असलेल्या वरुड तोफा या गावातील असून त्यांचे अनेक नातेवाईक आज ही वरुड तोफा गावात राहतात. तसंच त्यांचे काका शंकरराव वानखेडे, चुलत भाऊ संजय वानखेडे हे वाशिम इथं राहतात. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप केल्यावर समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या नातेवाईकांनी वाशिम शहरात निषेध मोर्चा काढला होता तसंच नवाब मलिक यांच्या विरोधात वाशिम पोलिसात तक्रार ही दिली होती.
Thalapathy Vijay ते Suriya हे अभिनेते एका चित्रपटासाठी घेतात 30 ते 100 कोटी
वाशिम न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिल्यानं हे प्रकरण काय वळण घेते हे येत्या काही दिवसात समजेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.