'अदनान सामीला 'पद्मश्री' देऊन मोदी सरकारकडून मुस्लिम मतांचं डॅमेज कंट्रोल'

'अदनान सामीला 'पद्मश्री' देऊन मोदी सरकारकडून मुस्लिम मतांचं डॅमेज कंट्रोल'

पाकिस्तानातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीने 'जय मोदी'चा नारा दिल्यानंतर त्याला भारताचे नागरिकत्व तर मिळेल तसेच त्याचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला जाईल. हा देशातील जनतेचा अपमान आहे

  • Share this:

मुंबई,27 जानेवारी: पाकिस्तानात जन्मलेला गायक अदनान सामी याला भारत सरकारने प्रतिष्ठीत समजला जाणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. अदनान सामी याला पद्मश्री जाहीर करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला असताना दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अदनान सामी याला पद्मश्री देऊन मोदी सरकार मुस्लिम मतांचं डॅमेज कंट्रोल करत आहे. पाकिस्तानातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीने 'जय मोदी'चा नारा दिल्यानंतर त्याला भारताचे नागरिकत्व तर मिळेल तसेच त्याचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला जाईल. हा देशातील जनतेचा अपमान आहे, असंही नवाब मलिक म्हणाले. पाकिस्तानातून येऊन भारतात स्थायिक झालेल्या अदनान सामीला 1 जानेवारी 2016 मध्ये भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले होते.

दरम्यान, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करून अदनानला जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराचा तीव्र निषेध केला आहे. अदनान सामी मूळ पाकिस्तानचा असल्याने मनसेचा त्याला पुरस्कार देण्याला विरोध आहे.

भाजप सरकारची चमचेगिरी केल्यामुळेच सन्मान...

काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी अदनान सामीला पद्मश्री मिळण्यावरून निशाणा साधत म्हटले की, प्रतिष्ठित सन्मान देण्यासाठी 'भाजप सरकारची चमचेगिरी' हा नवीन आदर्श बनला आहे. यावेळी शेरगिल यांनी प्रश्न उपस्थित केला की, कारगिल युद्धात सहभागी झालेल्या सनाउल्लाह सैनिकाला घुसखोर घोषित केले तर सामीला पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्याच्या वडिलांनी पाकिस्तानी वायुसेनेत राहुन भारतावर हल्ला केला होता. असे का?

अदनान सामी यांचे प्रत्युत्तर..

जयवीर शेरगिलच्या विधानावर अदनान सामीने ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. सामीने लिहिले की, "बाळा, तू तुझा मेंदू 'क्लीयरेन्स सेल' किंवा सेकंड हॅण्ड नॉव्हेल्टी स्टोअरमधून घेतला आहे का? एका मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या कामासाठी कारणीभूत ठरवणे किंवा शिक्षा द्यावी असे बर्कलेमध्ये शिकवण्यात आले आहे का? आणि तुम्ही एक वकील आहात. तुम्ही लॉ कॉलेजमध्ये हेच शिकले आहात का? यासोबत तुम्हाला शुभेच्छा."

First published: January 27, 2020, 4:37 PM IST

ताज्या बातम्या