Home /News /maharashtra /

उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य बरोबरच! नवाब मलिकांनीही साधला अमित शहांवर निशाणा

उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य बरोबरच! नवाब मलिकांनीही साधला अमित शहांवर निशाणा

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अमित शहांवर हल्लाबोल केला आहे.

    मुंबई, 18 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि त्यानंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीमार, या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केलं आहे. 'अमित शहा हे जनरल डायरपेक्षा कमी नाहीत,' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अमित शहांवर हल्लाबोल केला आहे. 'ज्याप्रकारे जनरल डायरने जालियनवाला बाग इथं लोकांवर गोळ्या झाडल्या त्याच प्रकारे अमित शहा हे या देशातील नागरिकांवर गोळ्या झाडत आहेत. म्हणून अमित शहा हे जनरल डायरपेक्षा कमी नाहीत. जामिया विद्यापीठात जे झालं ते जालियनवाला बाग इथं झालेल्या प्रकारासारखं आहे, हे उद्धव ठाकरे यांचं विधान योग्यच आहे,' असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर पलटवार करत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि त्यावरील आंदोलन यावर भाष्य केलं. अमित शहांचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल, शरद पवारांबद्दलही केलं भाष्य 'जामिया मीलीयात जे झालं ते जालीयनवाला बाग प्रकरणापेक्षा वेगळं नव्हतं. युवकांना बिथरवू नका, घात होईल, युवक तरुणाई म्हणजे बॉम्ब आहे,' असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amit Shah, Nawab Malik

    पुढील बातम्या