मोहन जाधव, (प्रतिनिधी)
रायगड, 16 ऑक्टोबर: देशावरील कोरोनाचं संकट अजून टळलं नसताना मंदिरे खुली करून संकटाला आमंत्रण देण्याची वेळ येऊ शकते. मात्र, राज्यातील भाजप नेते हे मंदिरे खुली करण्याचा पवित्रा घेत राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे योग्य नाही अशी टीका खासदार सुनील तटकरे यांनी भाजपवर केली आहे. आगामी काळात जिल्ह्यात सकारात्मक भूमिका घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही खासदार तटकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा..कन्हैय्या कुमार यांनी घेतली ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची भेट, राज्यात खळबळ
अलिबाग शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीला खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना भाजपचे सुरू असलेले राजकारण, आगामी निवडणुका बाबत धोरण, आमदार जयंत पाटील यांच्या मैत्रीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा काही प्रमाणात कमी होत चालला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमाने हळूहळू टाळेबंदी शिथिल करीत असून व्यवहार सुरू झाले आहेत. अशावेळी भाजपकडून राजकारण केले जात आहे. मंदिरे उघडण्याच्या दृष्टीने भाजपतर्फे आंदोलने केली जात आहेत. मात्र कोरोना महामारी ही अद्यापही नष्ट झालेली नाही असे असताना मंदिरे उघडून संकटाला आमंत्रण देण्याबाबत भाजपचा आग्रही आहे. त्यामुळे अशा संकट काळात भाजपने राजकारण न करता संयमी भूमिका घेणे गरजेचे आहे अशी टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्यामार्फत बैठका सुरू आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असून समनव्यक भूमिकेतून आगामी निवडणुकीत पक्ष सामोरे जाणार आहे. असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. अलिबागमध्ये पक्ष हा कमी पडत असला तरी कार्यकर्त्यांना पक्षाकडून उभारी देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार आहे. आढावा बैठकीनंतर अलिबागमधील पत्रकारांचा कोरोनयोद्धा म्हणून सत्कार खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
हेही वाचा...एकनाथ खडसे भाजप सोडणार का? पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रिया
जीवनात ही घडी अशीच राहू दे
शेकाप आमदार जयंत पाटील हे महाविकास आघाडी सोबत आहेत का आणि आपली मैत्री अद्याप आहे का यावर तटकरे यांनी, शेकाप हा महाविकास आघाडी सोबत आहे. आमदार जयंत पाटील यांच्या मैत्रीबाबत 'जीवनात ही घडी अशीच राहू दे' अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.