Maratha Reservation: आधीच्या सरकारनं दिलेले वकीलच आपण दिले, रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा

Maratha Reservation: आधीच्या सरकारनं दिलेले वकीलच आपण दिले, रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा

Rohit Pawar on Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणावरून राज्यातील नेत्यांनी राजकारण करू नये, असंही ते म्हणाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 5 मे: संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाचा  (Maratha Reservation) निर्णय सुप्रीम कोर्टाने (Supreme Court)  रद्द केला आहे. या निर्णयावरून आता राजकीय आखाडा तापाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनीही उडी घेतली असून भाजपवर निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी म्हटलं की, मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. यामुळे माझ्या सारख्या अनेक लोकांना वाईट वाटत आहे. आरक्षण मिळालं असतं तर लोकांना त्याचा फायदा झाला असता. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. त्यामुळे मी फक्त एकच विनंती करू इच्छितो की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन याबाबत चर्चा करायला हवी. मराठा समाजामधील युवा वर्गाच्या हिताचा निर्णय राज्य पातळीवर कसा घेता येईल? याबाबतचा विचार करण्याची गरज आहे असंही रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

हे ही वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय

मराठा आरक्षणावरून कोणीही राजकारण करू नये. कारण जे वकील आधीच्या सरकारने दिले होते. तेच वकील आपण कायम ठेवले होते. संबंधित वकीलांनी चांगल्याप्रकारे युक्तीवाद केल्याचं देखील आपण पाहिलं आहे. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो,असंही रोहित पवार पुढे म्हणाले.

Published by: News18 Desk
First published: May 5, 2021, 4:36 PM IST

ताज्या बातम्या