राष्ट्रवादीचा दिग्गज नेता मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित, पुन्हा भाजप प्रवेशाची चर्चा

राष्ट्रवादीचा दिग्गज नेता मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित, पुन्हा भाजप प्रवेशाची चर्चा

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 7 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि खासदार माजिद मेमन हे मेट्रो भूमिपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाला माजिद मेमन उपस्थित राहिल्याने ते देखील भाजपच्या वाटेवर आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली.

पक्ष बदलाची चर्चा सुरू होताच माजिद मेमन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'मी पक्ष बदलणार नाही. शरद पवारांचा मी विश्वासू सहकारी त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच नाही,' असा खुलासा माजिद मेमन यांनी केला आहे. मेमन यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांत राष्ट्रवादी सर्वात मोठे धक्के बसले आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.

माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी काल (शुक्रवारी) कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर ही बोलवण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सात गटातील बबनदादा शिंदे समर्थकांची गटनिहाय बैठक आयोजित करण्यात आलं. आमदार बबनदादा शिंदे हेदेखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी कार्यकर्त्यांची बैठक बोलवल्याने ते आता काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीचा 'प्लॅन पलटवार' तयार, मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू

माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. मात्र अजून राजकीय वाटाघाटी पूर्ण झाल्या नसल्याने बबनदादा शिंदेंचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला असल्याची माहिती आहे.

बबनदादा शिंदे यांचा भाजप प्रवेश झाला नसला तरीही राष्ट्रवादीने या मतदारसंघात कंबर कसली आहे. राष्ट्रवादीकडून बबनदादा शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवाजी कांबळे यांना विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं.

VIDEO: मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 12:24 PM IST

ताज्या बातम्या