मुंबई,7 मार्च: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी घृणा असलेल्या गणेश नाईकांना शेठजींच्या घरचं जेवण चालते पण कार्यकर्त्यांच्या घरचा पाणी चालत नाही. अशा गणेश नाईकांना 'कोरोना व्हायरस'चा ब्रँड Ambasider करा, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला आहे. गणेश नाईक बाळासाहेबांचे होऊ शकले नाही तर शरद पवारांचे काय होणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. गणेश नाईकांवर शरद पवारांच्या प्रचंड विश्वास होता. नाईकांनी पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. नाईकांनी स्वतःच्या पोराचा राजकीय बळी घेतला. पोराच्या तिकीटावर स्वतः उभे राहिले. आमदार मंदा म्हात्रे, विजय चौगुले यांनी फक्त गणेश नाईकांमुळे राष्ट्रवादी सोडली, असा आरोप आव्हाडांनी केला.
हेही वाचा..राज यांचे व्यंगचित्रातून ताशेरे, म्हणाले.. लोकांनी रामराज्य मागितलं, राममंदिर नव्हे
सत्ता फिरली की गणेश नाईक फिरले. शरद पवारांचे ऑपरेशन सुरू असताना ते राष्ट्रवादी सोडायला निघाले. गणेश नाईकांनी एकाही कार्यकर्त्याला मोठं केलं नाही. त्यांनी स्वतः पैसे कमावले. नगरसेवकांना पगारावर ठेवलं. सर्व रेती आणि उद्योग धंद्यामधील नवी मुंबईतील खंडणी गणेश नाईक वसूल करतात, असा घणाघाती आरोप केला.
दिघ्यातील नगरसेवक नवीन गवते आणि त्यांचे सहकारी 3 नगरसेवक येत्या 12 मार्चला शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
गणेश नाईकांच्या साम्राज्याला खिंडार पडणार
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. तुर्भेमधील भाजपचे चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा.. सैन्याचे 25 लाख युनिफॉर्म विकले गेले, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुक केले. तसेच तुर्भेमधील झोडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेही चांगलेच सक्रिय झाले आहेत. अशातच नगरसेवक फुटीची बातमी समोर आल्याने गणेश नाईक यांच्या अडचणी वाढू शकतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या नेत्यांनी गणेश नाईक यांना आव्हान दिलं होतं.