'राहुल गांधी...पुढे येऊन फॅसिझमविरुद्ध लढा', पत्राद्वारे जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन

'राहुल गांधी...पुढे येऊन फॅसिझमविरुद्ध लढा', पत्राद्वारे जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन

राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचं नेतृत्व करावं, अशी इच्छा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑगस्ट :  राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना जाहीर पत्र लिहित आवाहन केलं आहे. 'तुम्ही पुन्हा एकदा पुढे येवून काँग्रेसचं नेतृत्व करा,' असं आवाहन आव्हाड यांनी राहुल गांधींना केलं आहे.

'विकासाचा खोटा मुखवटा आणि लोकांची खरी काळजी यामधील ही लढाई आहे. अशी वेळ लवकरच येईल जेव्हा लोक फरक पाहतील आणि आपली विचारसरणी लोकांचं मने जिंकेल. तोपर्यंत आपण धैर्याने लढणं गरजेचं आहे. एखादं सैन्य पराभूत मानसिकतेने युद्ध जिंकू शकत नाही, हे इतिहासानं दाखवून दिलं आहे,' असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसचं नेतृत्व करावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

काँग्रेसचं अध्यक्षपद आणि गांधी घराणं

लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही, असं सांगण्यात आलं. पण अनेक दिवसांच्या मंथनानंतर इतर कोणत्याही नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब न झाल्याने पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं.

दरम्यान, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा परत घ्यावा, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणीही केली. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. राहुल यांच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष कोण असणार यावरून बरीच चर्चा रंगली होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मुकुल वासनिक यांचं नाव घेतलं जातं होतं. परंतु, काँग्रेसच्या बैठकीत पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी याआधीही 1998 पासून ते 2017 पर्यंत काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं.

SPECIAL REPORT: समुद्र किनारी रेतीतच रंगला 'कुस्तीचा फड', नारळी पौर्णिमेची अलिबागमध्ये धूम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या