उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका करताच आव्हाड सरसावले, केला जोरदार पलटवार

उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका करताच आव्हाड सरसावले, केला जोरदार पलटवार

उदयनराजेंच्या या टीकेचा आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

  • Share this:

सातारा, 14 जानेवारी : भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. 'अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,' असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. उदयनराजेंच्या या टीकेचा आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृगनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे.

'होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न...प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच,' असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

'महिलांना 30 टक्के आरक्षण, कोकण रेल्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव, जेएनपीटी...असे किती प्रकल्प सांगू...त्यामुळे गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक योगदान हे शरद पवार यांचंच आहे,' असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मोदींची तुलना, पवारांवर निशाणा...काय म्हणाले उदयनराजे?

तप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करणाऱ्या पुस्तकामुळे वादंग निर्माण झालं. भाजपवर चौफेर टीका करण्यात आली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवरायांचे वंशज कुठे आहेत? असा सवाल करत त्यांनी भाजपमधून राजीनामा द्यायला पाहिजे, अशीही मागणी केली होती. त्या टीकेचा भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

-शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली. मात्र जगात शिवाजी महाराज यांची उंची गाठता येईल असं कुणी नाही

कुणालाही 'जाणता राजा'ची उपमा देणं याचा निषेध

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज

शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष

लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का?

पुस्तकातल्या मजकुराबद्दल वाईट वाटलं

महाशिवआघाडीतून शिव का काढून टाकलं? शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का? उदयनराजेंची शिवसेनेवर टीका

शिवसेनेला नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का?

शिवाजी महाराज कुणी होऊ शकत नाही

महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग कला नाही

आम्ही त्या घराण्यात जन्माला आलो याचा सार्थ अभिमान

Published by: Akshay Shitole
First published: January 14, 2020, 2:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading