'आत्मनिर्भर'च्या गप्पा मारून झाल्यावर 'हे' रद्द करा, जितेंद्र आव्हाडांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

'आत्मनिर्भर'च्या गप्पा मारून झाल्यावर 'हे' रद्द करा, जितेंद्र आव्हाडांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

  • Share this:

मुंबई, 17 जून: भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. तर देशाचं राजकीय वातावरणही तापलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात आपले 20 जवान शहीद झाले. तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मादी गप्प का आहेत, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हेही वाचा... कोरोना चाचणीसाठी थेट लॅबमध्ये येणाऱ्यांबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

आत्मनिर्भरच्या गप्पा मारून झाल्यानंतर 12 जूनला दिल्ली मीरत मेट्रोच्या कामात एल अॅण्ड टी या भारतीय कंपनीला डावलून चिनि शांघाय टनेल इंजिनीअरिंग कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा, अशा शब्दात आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. दिल्ली मीरत मेट्रोच्या कामाचं चिनी कंपनीला कुणी दिलं कॉन्ट्रक्ट? रेल्वे कुणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या ना?

कसले बोंबलाचे परराष्ट्र धोरण??? अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

दरम्यान, याआधीही जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला होता. चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलं असून चीनला धडा शिकवायला पाहिजे, असेही आव्हाड म्हणाले होते. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे “लाल आंखे” करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता? असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

हेही वाचा..

देशात पुन्हा Lockdown लागणार का? पतंप्रधान मोदींनी दिलं हे उत्तर

First published: June 17, 2020, 9:36 PM IST

ताज्या बातम्या