शरद पवारांनी बाप बदलला नाही तर ते स्वत: बाप झाले, आव्हाडांचे नाईकांना प्रत्युत्तर
शरद पवारांनी बाप बदलला नाही तर ते स्वत: बाप झाले, आव्हाडांचे नाईकांना प्रत्युत्तर
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात द्वंद्व युद्ध सुरु झालं आहे.
ठाणे, 11 मार्च: नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात द्वंद्व युद्ध सुरु झालं आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. शरद पवार यांनी बाप बदलला नाही तर ते स्वत: बाप झाले, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांना पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं आहे. गणेश नाईकांना उपकरांची जाणीव नाही.
शरद पवार यांनी 1977 आणि 1999 साली पक्ष काढला. तुमच्या सारखे 60 ते 70 आमदार निवडून आणले. माझ्या सारख्या गरीबाच्या मुलाला इथपर्यंत आणलं कारण ते बाप झाले म्हणून त्यामुळे आज तुमच्या विधानावरुन तुम्ही दाखवून दिलत की तुम्ही कृतघ्न आहात. हे मी पुराव्यानिशी आगरी समाजाला दाखवून देणार आहे. तुम्ही आगरी समाजाच्या कधी पाठीशी उभे राहिला नाहीत. तुम्ही कधी नवी मुंबईतील गावांच्या पुनरसीमांकनासाठी पुढे आला नाहीत.
हेही वाचा...राज्यसभेसाठी भाजपकडून उदयनराजे आणि आठवलेंना उमेदवारी, तिसऱ्याबाबत सस्पेन्स
कायदा दाखवून नेहमी पळ काढलात जे तुम्ही केले नाही ते मी करुन दाखवणार. नवी मुंबई एवढ्या अडचणीत आहे पण त्यांवर कधी भाष्य केले नाही. मात्र, स्वत:च्या राजकीय हेतू साध्य व्हावा म्हणून तुम्ही मुलाचा ही बळी दिला. तुम्हाला तुमच्यावर केलेल्या उपकारांची मग ते नवी मुंबईकरांनी असो, आगरी समाजाने असो, बाळासाहेबांनी असो की शरद पवारांनी असो त्याची जाणीव तुम्हाला नसते. कारण तुम्ही कृतघ्न आहात. हे तुम्ही तुमच्या विधानांवरुन स्पष्ट केलं आहे. कुठल्या तरी फडतूस सिनेमाचा डायलाॅग मारुन बाप तुम्ही काढला होतात.मी नाही, याची ही आठवण करुन देतो, असं बोलत पुन्हा एकदा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर तोफ डागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.