'मातीसाठी खेळू रक्ताची होळी', राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली कविता

'मातीसाठी खेळू रक्ताची होळी', राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली कविता

महाराष्ट्रात भाजप वगळता इतर पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात होणारी आंदोलनं सध्या देशभर चर्चेचा विषय आहे. विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षही या कायद्याला विरोध करत आहेत. महाराष्ट्रात भाजप वगळता इतर पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही या कायद्याला आक्षेप घेतला आहे. तसंच आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक कविता शेअर करत याबाबत अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे.

'ह्या मातीत आहे राख आमच्या बा च्या बा ची, कुठून आणू कागद दाखवायला माझ्या ओळखीची, तेव्हा बी गोळ्या झेलल्या आज बी झेलू, ह्या मातीसाठी रक्ताची होळी कधी बी खेळू,' अशी कविता शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपला विरोध दर्शवला आहे.

CAA ला देशभरात गदारोळ

नागरिकत्व सुधारणा कायदा हा समाजात फूट पाडणं आणि लोकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणण्याचं काम करत असल्याचा आरोप करत अनेक ठिकाणी या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात भाजप वगळता इतर अनेक राजकीय पक्षांनीही सहभाग घेतला आहे. या आंदोलनात विद्यार्थी आणि तरूण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे सरकार काहीसं बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. कारण सरकारकडून या कायद्यासंदर्भात असणाऱ्या शंकांना उत्तर देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2019 03:22 PM IST

ताज्या बातम्या