मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बाबासाहेब बघत आहात ना, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांचा रंजन गोगोई यांना विरोध

बाबासाहेब बघत आहात ना, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांचा रंजन गोगोई यांना विरोध

राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना!, आणि सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या. बाबासाहेब बघता आहात ना..

राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना!, आणि सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या. बाबासाहेब बघता आहात ना..

राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना!, आणि सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या. बाबासाहेब बघता आहात ना..

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई,17 मार्च:सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर नियुक्ती केली. केंद्र सरकारने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. रंजन गोगोई यांनी अयोध्येतील राम मंदिरासह अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये निकाल दिला आहे. आता रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवरुन विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही जोरदार टीका केली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. सरकारी नोकर न्यायाधीशांना निवृत्तीनंतर 10 वर्षे राजकारण प्रवेशास बंदी घाला, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 'राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना!, आणि सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या. बाबासाहेब बघता आहात ना.. वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि न्यायाधीश ह्यांना निवृत्ती नंतर 10 वर्ष राजकारण प्रवेश बंदी ही काळाची गरज आहे तरच लोकशाही वाचेल', असंही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा..कोरोना व्हायरसचा मुंबईत पहिला बळी, 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू माजी सीजेआय गोगोई यांना अयोध्याच्या रामजन्मभूमी विवादावर सलग सुनावणी घेत प्रकरणी निकाली लावले होते. यासोबतच त्यांनी राफेल लढाऊ विमानाच्या खरेदी प्रकरणात केंद्र सरकारला क्लीन चीट दिली होती. दरम्यान, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाल 13 महिन्यांचा राहिला. रंजन गोगोई हे 46 वे सरन्यायाधीश ठरले. 1978 साली वकिली सुरु करणारे गोगोई 2001 मध्ये गुवाहाटी हायकोर्टात न्यायाधीश झाले. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2011 मध्ये पंजाब आणि हरियाणा हाय कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. राम मंदिरावर निर्णय तेणारे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपतींनी सोमवारी राज्यसभेवर नियुक्ती केली. मात्र, सरकारी नोकर न्यायाधीशांना निवृत्तीच्या नंतर 10 वर्ष राजकारण प्रवेशास बंदी घाला, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. हेही वाचा..कोरोना व्हायरसनं निर्माण केलं देव आणि भक्तांमध्ये अंतर, साईबाबा, महालक्ष्मी मंदिर बंद
First published:

पुढील बातम्या