वडील जाऊन 2 वर्षे झालीत तरी त्यांचे नाव..जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला संताप

वडील जाऊन 2 वर्षे झालीत तरी त्यांचे नाव..जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला संताप

जे जिवंत आहेत त्यांची नावे मतदार यादीत शोधूनही सापडत नाहीत. मात्र, मृत व्यक्तींची नावे अजून आढळून येतात. निवडणूक आयोगाकडून अतिशय वाईट काम सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मुंबईत मतदान पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानतंर आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. आव्हाड यांच्या वडिलांचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले, तरी मतदार यादीत त्यांचे नाव आढळून आले. आव्हाडांनी निवडणूक आयोगाबाबत संताप व्यक्त केला आहे. निवडणूक आयोग हा देशावर लागलेला कलंक असल्याची घणाघाती टीका आव्हाड यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, जे जिवंत आहेत त्यांची नावे मतदार यादीत शोधूनही सापडत नाहीत. मात्र, मृत व्यक्तींची नावे अजून आढळून येतात. निवडणूक आयोगाकडून अतिशय वाईट काम सुरू आहे.

एकाच महिलेचे 68 वेळा नाव

मतदार यादीत एकाच महिलेचे तब्बल 68 वेळा नाव आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बहुजन विकास आघाडीने 60 हजार मतदारांची नावे दुबारा आल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेने ५६ हजार मतदारांची दोनदा नावे असल्याचा आरोप केला आहे.

शिर्डी विमानतळावर विमान घसरल्याचा पहिला VIDEO

First published: April 29, 2019, 8:12 PM IST

ताज्या बातम्या