मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जितेंद्र आव्हाडांचा नरेंद्र मोदींवर पुन्हा निशाणा, '#अब_आगे_क्या' असं केलं Tweet

जितेंद्र आव्हाडांचा नरेंद्र मोदींवर पुन्हा निशाणा, '#अब_आगे_क्या' असं केलं Tweet

संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो

संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो

संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 5 एप्रिल: कोरोनाविरोधात लढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 9 मिनिटांचा वेळ मागितला होता. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता आपल्या घराबाहेर दिवा पेटवण्याचं त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं होतं. या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी घरातले लाईट्स ऑफ करुन दिवे लावून एकात्मतेचं दर्शन घडवलं. . मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री 9 वाजताचा महाड येथी चवदार तळ्याचा फोटो ट्वीट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. हेही वाचा...या देशातल्या शहरात रस्त्यावरच पडले मृतदेह, अंत्यसंस्काराला कुणीच तयार नाही संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो. ज्ञानसुर्य (डॉ.बाबासाहेब आंबेडकर) तेव्हाही तळपत होताच... आजही तळपतोच आहे. महाडची परंपरा कायम, #जय_भीम #अब_आगे_क्या, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तेव्हा काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड? 'भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,' अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. हेही वाचा...…आणि कोरोनासाठी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विकायला काढलं, OLX वरील पोस्टनंतर धावाधाव मोदींच्या आवाहनाची उडवली खिल्ली ... 5 तारखेला रात्री 9 वाजता घरातील लाईट घालवा आणि दिवे लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. पण आमचं म्हणणं वेगळं आहे. लाईट घालवून दिवे लावण्यात वेळ घालवू नका. उलट त्याक्षणी असतील त्या सगळ्या लाईट्स लावा. घरातल्या, दारातल्या, गॅलरी आणि बाल्कनीतल्या, गच्चीतल्या आणि सोसायटीतल्या, सगळ्या लाईट्स लावा', असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. एवढंच नाही तर मोदींची खिल्लीही उडवली होती. हेही वाचा..लातूरमधल्या 'त्या' कोरोनाबाधितांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीने वाढवली बीडकरांची धाकधूक ' जे लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत. त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त 101 रुपये द्या आणि त्याचा स्टेट्स आपल्या व्हॉट्सॲप, फेसबुकवर अभिमानाने ठेवा', अशी विनंतीही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केली आहे. लक्षात ठेवा. अंधारात कधीही चांगली कामं होत नाहीत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा', असं म्हणत त्यांनी मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवली.
First published:

Tags: Pm narenda modi

पुढील बातम्या