मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जितेंद्र आव्हाडांचा अयोध्या दौऱ्याला पाठिंबा.. म्हणाले श्री राम कोणाच्या मालकीचे नाही!

जितेंद्र आव्हाडांचा अयोध्या दौऱ्याला पाठिंबा.. म्हणाले श्री राम कोणाच्या मालकीचे नाही!

गेल्या पाच वर्षात झालेले घोटाळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरयू नदीत बुडवून रामाला अभिप्रेत असलेले राम राज्य निर्माण करायला जात असतील तर हे चांगलेच आहे.

गेल्या पाच वर्षात झालेले घोटाळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरयू नदीत बुडवून रामाला अभिप्रेत असलेले राम राज्य निर्माण करायला जात असतील तर हे चांगलेच आहे.

गेल्या पाच वर्षात झालेले घोटाळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरयू नदीत बुडवून रामाला अभिप्रेत असलेले राम राज्य निर्माण करायला जात असतील तर हे चांगलेच आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई,25 जानेवारी:शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा अयोध्येला जाणार आहेत. यासाठी त्यांनी आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनाही येण्याचं निमंत्रण दिल्याच्या वृत्त समोर येताच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, श्री राम हे कोणाच्या मालकीचे नाहीत, जय श्री राम हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय, महात्मा गांधीच्या तोंडी ही सदैव जय सियाराम हे बोल असायचे, प्रत्येक स्त्रीला वाटतं तिच्या आयुष्यात मर्याद पुरुषोत्तम असावा, देव देव आहे मला खंडोबामध्ये ही राम दिसतो. देव प्रत्येक कणात आहेत देव प्रातिनिधीक आहे. प्राकृतिक आहे. जर कोणी देवाला जात असेल आणि त्याची चर्चा होत असेल तर बघायलाच नको. गेल्या पाच वर्षात झालेले घोटाळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरयू नदीत बुडवून रामाला अभिप्रेत असलेले राम राज्य निर्माण करायला जात असतील तर हे चांगलेच आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचेच आहे, असं बोलून महाविकास आघाडीतील मंत्री आणि मुंब्रा कळवा सारख्या मुस्लिम बहुल मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे.

मोदी सरकार कोत्या मनोवृत्तीचे- जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासह 40 जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे. 20 जानेवारी पासून सुरक्षा रक्षक काढले आहे. सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबत अधिकृत माहिती केंद्रीय गृहखात्याने दिलेली नाही. तसेच राज्यात शरद पवार यांना 'झेड' सुरक्षा आहे. आहे. पवारांच्या घरात गस्त घालणारे दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान हटवण्यात आले आहेत. पवार यांच्या दिल्लीतील घरी सहा जनपथला तीन गार्ड होते. जे शिफ्ट मध्ये काम करत होते आणि एक PSO हा देखील होता. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता मोदी सरकारकडून सुरक्षेत कपात केल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार म्हणजे सह्याद्रीचा पहाड आहेत. त्यांची सुरक्षाव्यवस्था काढल्याने काहीही होणार नसून ते घाबरणाऱ्यांतले नसल्याचे वक्तव्य गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी शुक्रवारी केले. लोकांचे प्रेम हेच पवार यांचे सुरक्षाकवच असल्याचे सांगून केंद्रातील मोदी सरकार कोत्या मनोवृत्तीचे असल्याची टीकाही केली.

दरम्यान, आपण भाजपला कदापि घाबरणार नसल्याचे ते म्हणाले. पवार यांची सुरक्षाव्यवस्था काढली हे बरे झाले. कारण, महाराष्ट्राला कळले की, केंद्र सरकार किती कोत्या मनोवृत्तीचे आहे, अशी घणाघाती टीका देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

First published:

Tags: Ayodhya ram mandir, Jitendra avhad, Udhav thackeray