‘मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांसोबत राहणार’ जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

‘मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांसोबत राहणार’ जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना आणि काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने सत्ता स्थापन केली.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना आणि काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने सत्ता स्थापन केली. मुंबईतील राजभवनात शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन्ही मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्री मोठी उलथापालथ झाली.

महाराष्ट्रील या राजकीय उलथापालथीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी मरेपर्यंत शरद पवारांची साथ सोडणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी ट्विटर वरुन दिली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तिथून निघाल्यानंतर ते काहीसे भावूक झालेले दिसले.

राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घणाघाती हल्लाबोल केला आहे. 'अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपने त्यांना तसं करण्यास भाग पाडलं आहे,' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

नव्या राजकीय समीकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

'शरद पवार हे अजित पवारांच्या निर्णयासोबत नाहीत. अजित पवारांनी शरद पवारांच्याही पाठीत खंजीर खुपसला आहे,' असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सगळ्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीकडून फक्त अजित पवार कुटुंब दिसलं आहे. राष्ट्रवादीचे इतर कोणतेही नेते किंवा स्वत: शरद पवार हे यावेळी कुठेही दिसले नाहीत.

अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेचा घणाघात

अजित पवारांनी दिली माहिती

महिनाभर नुसतं चर्चेचं गुऱ्हार चालू होतं मात्र त्यामधून कोणताही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे स्थिर सरकार स्थापन कसं होणार हा प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे चांगल्यापद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस पुन्हा कसे झाले मुख्यमंत्री, पाहा राजभवनाचे INSIDE PHOTO

=========================================================================

First published: November 23, 2019, 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading