'आमच्यावर अश्लील टीका झाली, पण भाजप नेत्यांना...', जयंत पाटलांनी घेतली फिरकी

'आमच्यावर अश्लील टीका झाली, पण भाजप नेत्यांना...', जयंत पाटलांनी घेतली फिरकी

सोशल मीडियावरील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का, असा खरमरीत प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मे : कोरोनाच्या संकटकाळातही महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. सोशल मीडियावरील टीकेबाबत भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राषट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांची फिरकी घेतली आहे. तसंच सोशल मीडियावरील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का, असा खरमरीत प्रश्न विचारला आहे.

'भाजप नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापूर्वी त्यांनी 'आघाडी बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी,' अशी मागणीही जयंत पाटील यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टद्वारे केली आहे.

नक्की काय म्हणाले जयंत पाटील?

"आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजप नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टीका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टिका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का ?

गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टीका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती, त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहीये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये.

आज जागतिक हास्य दिन आहे. माझ्याकडून जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हसत रहा, हसवत रहा."

संपानदन - अक्षय शितोळे

First published: May 3, 2020, 3:21 PM IST

ताज्या बातम्या