उदयनराजेंविरुद्ध कोण लढणार? जयंत पाटील म्हणतात...

उदयनराजेंविरुद्ध कोण लढणार? जयंत पाटील म्हणतात...

विधानसभा निवडणुकांसोबतच होत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, 29 सप्टेंबर : राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत उदयनराजेंविरुद्ध उमेदवार कोण असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

'सातारा लोकसभेच्या जागेबाबत पृ्थ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. पण चव्हाण लोकसभा लढवण्यास फारसे उत्सुक नाहीत. सातारा जिल्ह्यात चव्हाण हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यामुळे आम्ही पुढील काही दिवसातच सर्वांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ,' असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण आज उदयनराजेंविरोधात दंड थोपटणार?

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्यभर चर्चेत आहे. कारण विधानसभेसोबतच ही निवडणूक होणार असली तरी उदयनराजे यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार त्याचा निर्णय अजूनही झालेला नाही. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे.

उदयनराजे साताऱ्याचा गड कसा राखणार?

निवडणुकांच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता आहे. मात्र विधानसभा निवडणुकांसोबतच होत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या उदयनराजेंसाठी यांच्यासाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक समजली जात आहे. कारण 2014 च्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचं मताधिक्य कमालीचं घटलं आहे. शिवसेनेच्या तिकीटावर लढलेल्या नरेंद्र पाटील यांनी यावेळी उदयनराजेंची चांगलीच दमछाक केली. उदयनराजेंनी विजय मिळवला खरा पण मताधिक्य मोठ्या प्रमाणात झालेली घट ही त्यांच्यासाठी धक्कादायक होती. म्हणूनच विजयानंतरही त्यांनी 'मताधिक्य कमी होणं हा एकप्रकारे माझा पराभवच आहे' असं विधान केलं होतं.

काश्मीरमधील ओसामा ठार; महिला कमांडरने केली कारवाई, ऑपरेशनचा VIDEO समोर

First published: September 29, 2019, 4:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading