...म्हणून सत्तास्थापनेत अडचणी निर्माण झाल्या, जयंत पाटलांचा आरोप

...म्हणून सत्तास्थापनेत अडचणी निर्माण झाल्या, जयंत पाटलांचा आरोप

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्तास्थापनेच्या पेचावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

सातारा, 7 नोव्हेंबर : 'आमच्या पक्षात जी काय फुटाफुटी व्हायची ती आधीच झाली आहे. त्यामुळे आता आमचा एकही आमदार फुटणार नाही. शिवसेनसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. आमची विरोधात बसण्याची तयारी आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्तास्थापनेच्या पेचावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसंच ही कोंडी का निर्माण झाली, यावरही भाष्य केलं आहे.

'आधी ठरल्याप्रमाणे सत्तेत समसमान वाटा मिळावा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. मात्र आधी जे ठरलंय ते भाजपकडून देण्यात येत नाही. यामुळेच सत्तास्थापनेत अडचणी निर्माण झाल्या आहेत,' असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपला लक्ष्य करण्याची एकही संधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सोडत नसल्याचं दिसत आहे.

'शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणार'

'अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चिपळुणमार्गे कोकणात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट देणार आहे. आम्ही राज्यपालांना भेटून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे,' असं म्हणत जयंत पाटील यांनी आगामी काळात राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

'मला युती तोडण्याची इच्छा नाही, पण...'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. 'मला स्वतःहून युती तोडायची नाही. भाजपने काय तो निर्णय घ्यावा. लोकसभेवेळी जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं. भाजप अध्यक्ष अमित शाहा यांच्यासोबत सगळे ठरलं होतं. समसमान वाटप हा फॉर्म्युला होता. युती कायम राहावी हीच इच्छा आहे. मात्र भाजपनं दिलेला शब्द पाळावा,' अशी भूमिका शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे अजूनही मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

VIDEO : काँग्रेसचाही प्लॅन तयार, 'या' नेत्याने केला मोठा खुलासा

First published: November 7, 2019, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading