Home /News /maharashtra /

'मी पुन्हा येईन' म्हटलं की लोक हसतात, जयंत पाटलांची टोलेबाजी, VIDEO

'मी पुन्हा येईन' म्हटलं की लोक हसतात, जयंत पाटलांची टोलेबाजी, VIDEO

' सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र केंद्राच्या एजन्सीच्या माध्यमातून काही लोक करत आहे'

' सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र केंद्राच्या एजन्सीच्या माध्यमातून काही लोक करत आहे'

' सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र केंद्राच्या एजन्सीच्या माध्यमातून काही लोक करत आहे'

    सिंधुदुर्ग, 30 ऑक्टोबर : 'मी कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामाची जबाबदारी देतोय आणि त्यांना शेवटी कधी मी येणार हे सांगावं लागतं तेव्हा 'मी पुन्हा येईन' बोलतो त्यावेळी लोक फार हसतात' असं म्हणत राष्ट्रवादीचे (ncb) नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी चांगलीच टोलेबाजी केली. जयंत पाटील हे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी  केंद्रीय तपास यंत्रणा ईडी आणि एनसीबीच्या मुद्यावरून भाजपवर टीका केली. 'महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप कडून होतोय. मात्र अडचणीत आणणारी व्यक्तीचं अडचणीत येतेय. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे अनिल देशमुखांनी काहीच केलेलं नाही. पण माणसाला मानसिक छळ देण्याचं काम आणि सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र केंद्राच्या एजन्सीच्या माध्यमातून काही लोक करत आहे, अशी टीका पाटील यांनी केली. तसंच, लवकर सत्तेत जाण्याची घाई झाल्यामुळे या सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणाच्या मार्गाचा वापर आणि अवलंब होताना दिसत आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी भाजपवर केली. जय मल्हार'ची म्हाळसा नव्या अवतारात; सुरभी हांडे 'या' मालिकेत दिसणार 'मी कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामाची जबाबदारी देतोय आणि त्यांना शेवटी कधी मी येणार हे सांगावं लागतं तेव्हा मी पुन्हा येईन बोलतो त्यावेळी लोक फार हसतात. आता  मी या वाक्याला समानअर्थी शब्द काय आहे हे शोधतोय मात्र अजून तो शब्द मिळत नाही म्हणून मी सगळ्यांना सांगतोय मी पुन्हा येईन. असं म्हणत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. डिप्रेशन आलेल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढणं पडलं महाग, द्यावे लागले 51 लाख दरम्यान, कॉंग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा आणि विद्यमान जिल्हा बँक संचालक प्रज्ञा परब यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कुडाळमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. प्रज्ञा परब या गेली दोन वर्ष काँग्रेस पक्षात सक्रीय नव्हत्या. मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांच्या सोबत वेंगुर्ला तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दरम्यान ह्या प्रवेशानंतर काँग्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Jayant patil

    पुढील बातम्या