मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जयंत पाटील यांनी व्यक्त केली मुख्यमंत्रिपदाची इच्छा, अजित पवारांचाही पाठिंबा!

जयंत पाटील यांनी व्यक्त केली मुख्यमंत्रिपदाची इच्छा, अजित पवारांचाही पाठिंबा!

'दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे', असं स्पष्ट विधान जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे.

'दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे', असं स्पष्ट विधान जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे.

'दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे', असं स्पष्ट विधान जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे.

इस्लामपूर (सांगली),  21 जानेवारी : राज्यातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये अनेक नेते हे मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असल्याचं मानलं जातं. विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये याची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

सांगलीतील (Sangli) इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी त्यांची राजकारणातील इच्छा बोलून दाखवली आहे. इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे. " दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे '' असं स्पष्ट विधान जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे.  त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आता पाटील यांनीही आपली उघड उमेदवारी जाहीर केल्याचं मानलं जात आहे.

(हे वाचा-मुंबई उच्च न्यायालयाचा सोनू सूदला झटका! BMC विरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळली)

'मुख्यमंत्री व्हावं वाटतं पण..'

मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना जयंत पाटील यांनी यावेळी राजकीय भानही जपलं आहे. "आमच्या पक्षाकडं सध्या ते पद नाही. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर प्रथम पक्ष आणि आमदारांची संख्या वाढवणे गरजेचं आहे. ती संख्या पुरेशी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल,'' असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. मंत्रीपदापेक्षा प्रदेशाध्यक्षपद भावतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

(हे वाचा-शरद पवारांची मध्यस्थी, नाहीतर खेळाडूंनी मिस केली असती इंग्लंडविरुद्धची टेस्ट)

अजित पवारांचा पाठिंबा

दरम्यान जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर येताच, राष्ट्रवादीतून त्यांना पाठिंबा मिळाला आहे. 'जयंत पाटील यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असेल तर मी पाठिंबा देतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या काळात या विषयावर आणखी राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Jayant patil, NCP, Sharad pawar