मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खामोश, यहां के असली खिलाडी हम है! जयंत पाटलांचा दोन्ही मुलांसोबत ठेका, Video व्हायरल

खामोश, यहां के असली खिलाडी हम है! जयंत पाटलांचा दोन्ही मुलांसोबत ठेका, Video व्हायरल

जयंत पाटलांचा दोन्ही मुलांसोबत ठेका, Video व्हायरल

जयंत पाटलांचा दोन्ही मुलांसोबत ठेका, Video व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील आपल्या दोन्ही मुलांच्या सोबत थिरकले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

सांगली, 23 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील आपल्या हजरजबाबी स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांच्या वक्तव्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. याच जयंत पाटील यांचं नवीन रुप आता समोर आलं आहे. जयंत पाटील यांनी आपल्या दोन मुलांसह गाण्यावर ठेका धरत डान्स केला आहे. याचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जयंत पाटील जेव्हा ठेका धरतात

"खामोश" यहां के असली खिलाडी हम है, अशा डायलॉगवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील आपल्या दोन्ही मुलांच्या सोबत थिरकले आहे. चिरंजीव राजवर्धन आणि प्रतीक या दोघांच्या समवेत जयंत पाटील यांनी डायलॉग म्हणत गाण्यावर ठेका धरला. पिता-पुत्रांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्ह्यायरल झाला आहे. आमदार जयंत पाटील यांच्या मोठ्या मुलाचं लग्न सोहळा 27 नोव्हेंबर रोजी पार पडत असून, त्या निमित्ताने संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मागच्या वर्षी एका मुलाचं विवाह संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका मुलाचं मागच्या वर्षी मुंबईत छोटेखानी कार्यक्रमात लग्न पार पडलं होतं. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात खुद्द शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या मुलानं आयफेल टॉवरवर जाऊन मुलीला प्रपोज केल्याचा किस्सा सांगितला होता. त्यावेळी शरद पवार यांनी म्हटलं होतं की, जयंतरावाच्या मुलानं पॅरिसच्या आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केलं. दोघांचं जुळलं, पण आमची पोरं काय करतील याचा नेम नाही. या नात्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळली आहे. आता, आम्ही वाळवा, इस्लामपूरपर्यंत मर्यादित राहिलो नाही. थेट पॅरिसलाच जातो. ठिकाणं इंटरनॅशनल असलं, तरीही दोघं स्थानिकच आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल.

First published:

Tags: Jayant patil, NCP