'शरद पवारांविरोधात कट-कारस्थान करणाऱ्यांना जनता धडा शिकवणार'

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 04:40 PM IST

'शरद पवारांविरोधात कट-कारस्थान करणाऱ्यांना जनता धडा शिकवणार'

सांगली, 14 ऑक्टोबर : 'शरद पवार यांच्याविरोधात कट-कारस्थान करणाऱ्या भाजप-सेनेला धडा शिकवण्यासाठी जनता एकवटली आहे,' असं म्हणत ईडीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सांगलीत बोलताना जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

'आम्ही मातीतील कुस्ती खेळणारे पैलवान आहोत. पण मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेले फोटो लावलेला प्रसिद्ध करावा. एकदा कळू द्या तेल लावल्यावर कसे दिसत आहेत,' असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आव्हानाची खिल्ली उडवली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेली खालच्या स्तरातील टीका महाराष्ट्र सहन करणार नाही,' असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

'सत्तापरिवर्तन होणार'

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तापरिवर्तन होणार असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता येणार आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या या दाव्याला भाजप आणि शिवसेना कसं उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री Vs पवार

Loading...

विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यामध्ये शरद पवार विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'मुख्यमंत्री म्हणतात आम्ही तयार आहोत, पण कुस्ती करायला समोर कुणीच राहिलं नाही. पण कुस्ती ही पैलवानांसोबत करायची असते. या असल्यांसोबत नाही,' असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावत शरद पवारांनी पलटवार केला आहे. यावेळी पवारांनी काही हातवारेही केले.

शरद पवार यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही जोरदार उत्तर दिलं. 'पवार साहेब नटरंग सारखे हातवारे करायला लागले आहेत. असं म्हणत बार्शीमधील पवारांच्या हातवाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. त्यामुळे प्रचारासाठी शिल्लक राहिलेल्या इतर दिवसांमध्येही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगणार असल्याचं दिसत आहे.

VIDEO : 'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 04:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...