राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या बँकेतील सचिवाचा मृत्यू, महामार्गावरील अपघातात गमावला जीव

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या बँकेतील सचिवाचा मृत्यू, महामार्गावरील अपघातात गमावला जीव

Ertiga कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता

  • Share this:

मुंबई, 3 मार्च : मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोलीजवळील पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या Ertiga कारला पेपर कॉइल घेऊन जाणाऱ्या ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने कारमधील एक जण ठार आणि इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे पेपर कॉइल घेऊन जाणाऱ्या ट्रकने Ertiga कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. रणभीर चव्हाण असे मृत्युमुखी पडलेल्या अपघात ग्रस्ताचे नाव आहे. हा अपघात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींना उपचाराकरता पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच चव्हाण हे कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेशी संबंधित असल्याचे माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. अपघातानंतर तातडीने हायवे पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. अपघातात मृत्यू झालेले रणभीर चव्हाण हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ  नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचा सचिव असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातानंतर काही काळ एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली होती. परंतु डेल्टा फोर्स महामार्ग पोलीस देवदूत यंत्रणेच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे. पहाटेच्या वेळात महामार्गावरील अपघाताच्या घटना होताना दिसतात. त्यामुळे या काळात अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

हे वाचा - 22 वर्षे देशासाठी कातडं झिजवलं पण दिल्ली हिंसाचारानं क्षणात रस्त्यावर आणलं

First published: March 3, 2020, 10:24 AM IST

ताज्या बातम्या