मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सुजय विखेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी विखे पाटलांबाबत केला मोठा खुलासा

सुजय विखेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी विखे पाटलांबाबत केला मोठा खुलासा

हसन मुश्रीफ यांनी आज शासकीय आढावा बैठका घेत विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

हसन मुश्रीफ यांनी आज शासकीय आढावा बैठका घेत विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

हसन मुश्रीफ यांनी आज शासकीय आढावा बैठका घेत विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

अहमदनगर, 21 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शासकीय आढावा बैठका घेत विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. आपलेच सरकार येणार या भ्रमात राहिलेल्या देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने मोठा झटका बसल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटलं. तसंच यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत मोठा खुलासाही केला आहे.

'महाविकास आघाडीचे सरकार दीर्घकाळ चालेल आणि विखे पाटील सुद्धा परत येतील,' असा दावा हसन मुश्रीफ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि खासदार सुजय विखे यांच्याकडे पाहात केला. मुश्रीफ यांच्या या दाव्यामुळे नगरमध्ये आता विखे पाटलांबद्दल नवी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आगामी काळात खरंच विखे पाटील महाविकास आघाडीची वाट धरणार का, हे पाहावं लागेल.

मगरीने केला शेतकऱ्यावर हल्ला, पण बळीराजाच्या मदतीला धावून येत बैलाने वाचवला जीव

मुश्रीफांनी केलं इंदोरीकर महाराजांचं समर्थन

'मुली मोबाईल वापरतात, पालकांनी लक्ष द्यावे', या इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचे हसन मुश्रीफ यांनी समर्थन केलं आहे. सध्या चर्चेत असलेल्या इंदोरीकर महाराजांबाबत मुश्रीफ यांनी सकारात्मकता दाखवली आहे. तसंच ते एक लोकप्रिय आणि चांगले कीर्तन करतात, असे सांगताना मुली मोबाईल वापरतात म्हणून पालकांनी लक्ष दिले पाहिजे, या इंदोरीकर यांच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे.

First published:
top videos

    Tags: MLA Hasan Mushrif, Radha krishna vikhe patil