चंद्रकांत पाटलांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचा पलटवार, कोल्हापूरमधील नेत्यानीच केला हल्लाबोल

चंद्रकांत पाटलांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचा पलटवार, कोल्हापूरमधील नेत्यानीच केला हल्लाबोल

राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका केली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 25 एप्रिल : 'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावर राहू नयेत, अशी आघाडीतीलच काही असंतुष्ट नेत्यांची इच्छा आहे,' असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका केली आहे.

'हे खुळं काय बोलतंय. प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यव्याची दखलही घेतली नाही. जगातील सर्वात मोठा विनोद म्हणजे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य,' अशा शब्दांमध्ये हसन मुश्रीफ यांनी पाटील यांचा समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीच्या या प्रत्युत्तरानंतर चंद्रकांत पाटील पुन्हा काय बोलणार, हे पाहावं लागेल.

चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले होते?

'उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा महाविकास आघाडीने राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव बेकायदेशीर आहे, त्यात आम्ही का पुढाकार घ्यावा?' असं म्हणत पाटील यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच महाविकास आघाडीतीलच इतर नेत्यांवर गंभीर आरोप केला.

हेही वाचा- कोरोनाचा धोका वाढल्यानंतर अजित पवार पुण्यात, दिल्या 9 महत्त्वपूर्ण सूचना

'आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे. उगीच आम्हाला कशाला बोट लावता? असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर आरोप केला. त्यांच्या आरोपानंतर तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे, असा सवाल केला असता, पाटील म्हणाले, 'मी कशाला नाव घेऊ? ज्याला टोपी बसेल त्याला बसेल.' असं म्हणून उत्तर देण्याचं टाळलं.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 25, 2020, 6:22 PM IST

ताज्या बातम्या