• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • गोपीचंद पडळकरांवर टीका करताना राष्ट्रवादीच्या नेत्याचीही जीभ घसरली

गोपीचंद पडळकरांवर टीका करताना राष्ट्रवादीच्या नेत्याचीही जीभ घसरली

पडळकरांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या नेत्याचीही जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:
कोल्हापूर, 28 जून : कोरोनाच्या संकटकाळातही महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. अनेक जिल्ह्यांमधून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवार यांच्यावरील टीकेचा निषेध करत आहेत. मात्र पडळकरांना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या नेत्याचीही जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. 'देशाचे नेते शरद पवार यांच्यावर गोप्या पडळकर याने जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करतो,' असं म्हणत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकेरी शब्दांमध्ये पडळकर यांच्यावर हल्ला चढवला आहे. 'नथुराम गोडसे याचं ज्या पध्दतीने उदात्तीकरण केलं जातं त्याच पद्धतीचं उदात्तीकरण गोप्या पडळकर याचं केलं जात आहे,' असंही मुश्रीफ म्हणाले. कॅबिनेट मंत्र्यानेच एकेरी शब्दांमध्ये टीका केल्याने पुन्हा एकदा वादंग निर्माण झालं आहे मुश्रीफ यांचा गंभीर आरोप 'पडळकर यांच्या वक्तव्यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच बोलविता धनी आहेत. राज्यात आता शिव्या देण्याची मालिका सुरू झाली. आम्ही देखील अशा शिव्या देवू ज्याने त्यांना झोपा लागणार नाहीत,' असा इशारा देखील हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. आजच्या पत्रकार बैठकीत हसन मुश्रीफ यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा वारंवार गोप्या पडळकर असा उल्लेख केला. त्यामुळे मुश्रीफ यांची देखील जीभ घसरल्याचं बोललं जात आहे. चंद्रकांत पाटलांचा पलटवार 'कुणी कुणाला धमकी द्यायची आवश्यकता नाही, कुणाला घाबरत नाही,' असं म्हणत हसन मुश्रीफ यांच्या आव्हानाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'सुरुवात कुणी केली महत्वाचं नाही, पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडली. जे पेरता तेच उगवतं, एकत्र बसून बिघडलेली राजकीय संस्कृती नीट केली पाहिजे. अन्यथा याचा शेवट कुठंही होऊ शकतो. कोण चंपा म्हणतं कोण टरबूज म्हणतं हे कसं चालतं?' असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published: