गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला! नवी मुंबईत होणार भव्य कार्यक्रम

गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला! नवी मुंबईत होणार भव्य कार्यक्रम

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

  • Share this:

विनय म्हात्रे, नवी मुंबई, 1 सप्टेंबर : नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. गणेश नाईक हे 9 सप्टेंबरला नवी मुंबईत भव्य कार्यक्रमात भाजप प्रवेश करणार आहेत. नाईक यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि माजी खासदार संजीव नाईक हेदेखील भाजपमध्ये जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत गणेश नाईक भाजपमध्ये दाखल होतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा जे पी नड्डा हेदेखील नाईकांच्या भाजप प्रवेशावेळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाईकांनी सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नाईक कुटुंबात नाही पडणार फूट

दरम्यान, भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना मोठा झटका बसेल असं बोललं जात होतं. कारण गणेश नाईक यांचा मोठा मुलगा आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी काल (शनिवारी) राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत सपत्नीक गाडीने प्रवास केला. संवाद यात्रेच्या माध्यामातून सुप्रिया सुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. नवी मुंबईतील संवाद यात्रेवेळी संजीव नाईक हे आपल्या पत्नीसह सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसून आले. संजीव नाईक यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत सुप्रिया सुळेंना सोडलं. तसंच दुपारी 1 वाजता पुन्हा सुप्रिया सुळे आणि संजीव नाईकांची भेट झाली. त्यामुळे संजीव नाईक हे राष्ट्रवादीतच राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. मात्र आता संजीव नाईक यांच्याही भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे.

गणेश नाईक राष्ट्रवादीला खिंडार पाडणार

गणेश नाईक नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांचे पूत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता जिल्ह्यातील नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह गणेश नाईक लवकरच प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे.

राष्ट्रवादीनेही भाजपच्या या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी हालाचाली सुरू केल्या आहेत. नवी मुंबईत नवं नेतृत्व उभं करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता विरोधी पक्षातील नाराजांना संपर्क केला जात आहे.

SPECIAL REPORT : पाटील पितापुत्रांचा पवारांना धक्का, सेनेच्या गोटातही नाराजी?

Published by: Akshay Shitole
First published: September 1, 2019, 9:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading