Home /News /maharashtra /

'मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल', ही भावना अजून गेली नाही, खडसेंनी फडणवीसांना डिवचलं

'मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल', ही भावना अजून गेली नाही, खडसेंनी फडणवीसांना डिवचलं

भाजपचा पराभव हा अंहमपणामुळे झाला आहे. त्याचबरोबर फाजिल नेतृत्वामुळे

भुसावळ, 4 डिसेंबर: विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं (Mahavikas Aaghadi) जोरदार मुसंडी मारत भाजपला धूर चारली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी भाजपसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव हा अंहमपणामुळे झाला आहे. त्याचबरोबर फाजिल नेतृत्वामुळे भाजपचा पराभव झाला, अशी रोखठोक प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही, अशा शब्दात खडसेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. हेही वाचा...निवडणुकीत एकही जागा न जिंकलेल्या शिवसेनेवर देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ एकनाथ खडसे म्हणाले की, लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे. तर महाविकास आघाडीवर विश्वास आणखी दृढ होताना दिसत आहे. महाविकास आघाडीला एकीचं फळ मिळालं आहे. भाजपमध्ये हम करे सो कायदा होता म्हणून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असल्याची खोचक टीका खडसेंनी दिली आहे. चंद्रकांत पाटलांना टोला... चंद्रकांतदादा पाटील नेहमी म्हणत की, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही. आम्ही हिमालयात जाऊन बसू, त्यांच्या नुसत्या गप्पा असतात, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे. रोहित पवारांचा खोचक सल्ला... दुसरीकडे, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. 'भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती, अशी प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची 'जागा' दाखवून दिली, असा टोला देखील रोहित पवार यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे. हेही वाचा...BJP नेत्यानं मर्यादा सोडली, ममता बॅनर्जींना दिली शिवी म्हणाले... भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत येथे महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळं आतातरी भाजपनं (@BJP4Maharashtra)नं खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिक काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही, अशा शब्दांत रोहित पवार यांनी खोचक सल्ला देखील दिला आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Devendra Fadnavis, Eknath khadse, Jalgaon, Maharashtra

पुढील बातम्या