मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

"लोकनेत्या असल्यामुळे त्यांनी मस्करीत वक्तव्य केलं तरी...." पंकजा मुंडेंबाबत काय म्हणाले एकनाथ खडसे?

"लोकनेत्या असल्यामुळे त्यांनी मस्करीत वक्तव्य केलं तरी...." पंकजा मुंडेंबाबत काय म्हणाले एकनाथ खडसे?

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरही भाष्य केले.

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरही भाष्य केले.

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरही भाष्य केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  News18 Desk

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी

जळगाव, 30 सप्टेंबर : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरीही मला संपू शकत नाहीत जर मी तुमच्या मनात असेल तर असं म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट मोदींना आव्हान दिले. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित "समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद" या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे, मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणी संपवू शकत नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावर आता राष्टवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले एकनाथ खडसे -

पंकजाताई मुंडे यांनी जे पंतप्रधान यांच्या विषयी केलेलं वक्तव्य हे अर्धवट मीडियामध्ये प्रकाशित झालं आहे. कालचे वक्तव्य हे पूर्ण जर ऐकलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो. मी मोदीजींना आवाहन देऊ शकत नाही, असं पंकजाताईंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला सांगितले.

मी बेरोजगार आहे त्यांनी हे वक्तव्य मंदिरात कार्यकर्त्यांशी बोलताना मस्करीमध्ये बोलताना केलं. मीच बेरोजगार आहे तर तुला रोजगार कसा देऊ असं कार्यकर्त्यांशी बोलताना त्या म्हणाल्या. या विषयाचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. पंकजाताईंनी मस्करीमध्ये देखील म्हटलं तर लोकनेत्या असल्यामुळे हलचल निर्माण होते, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

शिंदे सरकारची प्रतिमा मलिन होतेय म्हणून...

यावेळी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरही भाष्य केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं तेव्हापासून त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य वेगवेगळे भाष्य करता आहेत. त्यामुळे जे भाष्य ते सदस्य करतायेत टीकेचे पात्र होत आहे.

हेही वाचा - 'उद्धव ठाकरेंनी केलेल्या 'त्या' गद्दारीचा एकनाथ शिंदेंनी बदला घेतला', चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

कधी तानाजी सावंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, तर कधी अब्दुल सत्तार, त्यामुळे यांची विसंगत वक्तव्य समोर येत असून जो असेल तो वेगवेगळे वक्तव्य करतोय. त्यामुळे या सरकारची प्रतिमा ही मलीन होत आहे. म्हणून शिंदेंनी इतर सर्व नेत्यांना कमी बोलण्याच्या सूचना दिल्या, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

First published:

Tags: Eknath khadse, Maharashtra politics, Pankaja munde